Saturday, May 16, 2026
Homeजळगावधरणगाव : गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

धरणगाव : गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांचा मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प

धरणगाव ( प्रतिनिधी)

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी अशोक बिऱ्हाडे यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला आहे.

- Advertisement -

वाढदिवशी मरणाची कल्पना खरं तर अनेकांना चमत्कारिक वाटू शकते. मात्र, बिऱ्हाडे यांनी प्रबोधनाची कास धरत एक अभिनव संकल्प केला आहे.

विधायक कार्याचा उपदेश किंवा भाषणातून पुरस्कार करण्याऐवजी ते त्यांनी स्वतः कृतीतून समोर ठेवले आहे.

कर्तव्यदक्ष गटशिक्षणाधिकारी म्हणून ख्याती असलेले समाजाप्रती जाण असलेले उत्तम मार्गदर्शक अशोक बि-हाडे तालुक्यात सुपरिचित आहेत.

६ डिसेंबर रोजी त्यांचा वाढदिवस आहे, वाढदिवसाचे औचित्य साधून त्यांनी मरणोत्तर नेत्रदानाचा संकल्प केला असून एक नवा आदर्श घालून दिला आहे.

ताज्या बातम्या

Nashik News : पंचवटीत सराफा दुकानावर सशस्त्र दरोडा; महिलेवर प्राणघातक हल्ला...

0
पंचवटी | प्रतिनिधी Panchavati पंचवटीतील हिरावाडी परिसरातील महालक्ष्मी नगर येथील 'समृद्धी ज्वेलर्स या दुकानावर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास ४ ते ५ अज्ञात दरोडेखोरांनी सशस्त्र दरोडा टाकला....