Thursday, March 13, 2025
Homeधुळेमोठी बातमी! धुळ्यात गणेश विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना; ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ३ बालकांना...

मोठी बातमी! धुळ्यात गणेश विसर्जनादरम्यान दुर्दैवी घटना; ट्रॅक्टरचालकाचे नियंत्रण सुटल्याने ३ बालकांना चिरडले

धुळे | प्रतिनिधी
शहरानजीक असलेल्या चितोड गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत आज दुपारी अत्यंत दुर्दैवी अशी घटना घडली. मिरवणुकीतील ट्रॅक्टर वरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टरच्या चाकाखाली येऊन तीन बालकांचा मृत्यू झाला आहे. तर ६ जण जखमी आहेत. जखमींना तात्काळ हिरे वैद्याकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली आहे.

अनंत चतुर्दशीनिमित्त आज शहरासह परिसरात सकाळपासूनच ढोल ताशे, पारंपारिक वाद्याच्या गजरात व डीजेच्या दणदणाटात गणेश विसर्जन मिरवणुका सुरू झाल्या आहेत. शहरालगत असलेल्या चितोड गावात देखील दुपारी एकलव्य गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरु होती. यावेळी मिरवणूकीत सहभागी असलेल्या ट्रॅक्टरवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर थेट समोर असलेल्या भाविकांच्या अंगावर गेला. त्यात बालकांसह नऊ ते दहा जण जखमी झाले. ग्रामस्थांनी धाव घेत जखमींना धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सर्वोच्चार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.

- Advertisement -

उपचारादरम्यान या अपघातातील परी शांताराम बागुल ( वय १३), शेरा बापू सोनवणे (वय ६) आणि लड्डू पावरा ( वय ३) या तीन बालकांचा मृत्यू झाला. तर गायत्री पवार (वय २५), विद्या भगवान जाधव (वय २७), अजय रमेश सोमवंशी (वय २३), उज्वला चंदे मालचे (वय २३), ललिता पिंटू मोरे (वय १६), रिया दुर्गेश सोनवणे (वय १७) या जखमींवर उपचार सुरू आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Dadasaheb Khindkar : धनंजय देशमुखांचा साडू पोलिसांना शरण; तरुणाला केली होती...

0
मुंबई | Mumbai मागील काही दिवसांपासून सोशल मीडियावर बीड येथील मारहाणीचे विविध व्हिडीओ व्हायरल होत आहेत. सगळ्यात आधी मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांना (Santosh Deshmukh) मारहाण...