Monday, October 12, 2026
Homeधुळेधुळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धुळ्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार

धुळे – Dhule – प्रतिनिधी :

शहरातील साक्री रोडवरील यशवंत नगरातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करुन तिची आक्षेपार्ह छायाचित्र काढून सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी एकाविरुध्द शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीसांनी एकाला अटक केली आहे.

- Advertisement -

याबाबत पीडित मुलीची आईने शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, 14 वर्षीय मुलीचा रोहित नाना शिंदे (रा. यशवंत नगर, धुळे) याने वेळोवेळी पाठलाग करुन तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्तापित केले.

व तिचे आक्षेपार्ह छायाचित्र काढून ते सोशल मिडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. तसेच तिच्या आई-वडीलांना शिवीगाळ करुन धमदाटी केली. त्याने मे 2020 ते 9 मार्च दरम्यान त्या पीडितावर अत्याचार केला.

पीडिताच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन भादंवि 376 (2), (एन), 376 (3), 354 (अ), 504, 506 सह लैंगिक अपराधापासून बालकांचे संरक्षण अधिनियम 2012 चे कलम 4, 8, 12 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी रोहित शिंदेला अटक केली.

ताज्या बातम्या

Devendra Fadnavis : राहुल गांधींचे संविधानिक संस्थांवर दबाव आणण्याचे मोठे षडयंत्र;...

0
मुंबई | Mumbai काँग्रेसने (Congress) सर्वोच्च न्यायालयावर (Supreme Court) काढलेली मोर्चाची हाक आणि सरन्यायाधीशांकडे चर्चेसाठी मागितलेली वेळ यावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि विरोधी...