Friday, July 3, 2026
Homeधुळेधुळे : लाखो रूपयांचा गुटखा जप्त ; शिरपूर पोलीसांची कामगिरी

धुळे : लाखो रूपयांचा गुटखा जप्त ; शिरपूर पोलीसांची कामगिरी

धुळे
महाराष्ट्रात गुटखा बंदी लागू असून शिरपूर मध्ये महिंद्रा कंपनीच्या पिकप व्हॅनमधून अवैधरित्या गुटका वाहून नेला जात होता.

शिरपूर पोलिसांना पळसनेर मार्गे वाघाडी जाणाऱ्या महिंद्रा कंपनीच्या पिकपमध्ये लाखो रुपयांचा विविध कंपन्यांचा गुटखा वाहून नेला जात असल्याची माहिती मिळताच शिरपूर पोलिसांनी सापळा रचून शिताफीने या वाहनाचा पाठलाग केला असता यामध्ये विविध कंपन्यांचा गुटख्याचा मोठ्या प्रमाणात साठा आढळून आला.

- Advertisement -

हा गुटका दुसऱ्या जिल्ह्यात विक्रीसाठी नेत असल्याचे पोलिसांना समजले, पोलिसांनी केलेल्या कारवाईत महिंद्रा पिकप सह मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

गुटखा

Nashik Crime News: इगतपुरी येथील समृद्धी महामार्गालगत ६९ लाख ३३ हजार...

0
इगतपुरी । प्रतिनिधीतालुक्यातील पिंप्रीसदो फाट्याजवळील समृद्धी महामार्गाचा वापर करून राज्यात व बाहेर अन्य जिल्ह्यांत होणारी राज्यातील प्रतिबंधित सुगंधी तंबाखु, गुटखा तस्करी होत असतांना इगतपुरी...