Thursday, June 18, 2026
Homeब्रेकिंग न्यूजTrain Accident : दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली; २ प्रवाशांचा मृत्यू

Train Accident : दिब्रुगड एक्स्प्रेस रुळावरून घसरली; २ प्रवाशांचा मृत्यू

अनेक प्रवासी जखमी झाल्याची शक्यता

उत्तरप्रदेश

चंडीगड येथून आसामला जाणाऱ्या दिब्रुगड एक्स्प्रेसचे १० डबे रुळावरून घसरून झालेल्या अपघातात दोन प्रवाशांचा मृत्यू झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा रेल्वे अपघात आज दुपारी उत्तर प्रदेशमधील गोंडा येथे झाला.

- Advertisement -

चंडीगड येथून दिब्रुगडला जाणारी ट्रेन क्रमांक १५९०४ दिब्रुगड एक्स्प्रेस ही आज दुपारी २ च्या सुमारास गोंडा जंक्शन येथून पुढच्या प्रवासाला निघाली होती. मात्र काही गोंडापासून २० किमी अंतरावर या रेल्वेचा अपघात झाला.

अपघाताची माहिती मिळाल्यानंतर रेल्वेचे अधिकारी घटनास्थळी दाखल होऊन बचावकार्य सुरू करण्यात येत आहे. या अपघातामुळे या मार्गावरील रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनीही या अपघाताची दखल घेतली असून मदतकार्याचे आदेश दिले आहेत.

ताज्या बातम्या

विधान परिषद निवडणुकीसाठी राज्यभरात ९९.०२ टक्के मतदान

0
मुंबई | प्रतिनिधी Mumbai बिनविरोध निवडणुकीमुळे चर्चेत असलेल्या विधान परिषदेच्या राज्यातील ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी गुरुवारी शांततेत मतदान पार पडले. सकाळी ८ ते सायंकाळी...