Thursday, November 19, 2026
HomeनगरPomegranate Rate : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

Pomegranate Rate : राहाता बाजार समितीतील डाळिंबाचा वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

येथील बाजार समितीत (Rahata Market Committee) गुरुवारी (दि.19) डाळिंबाला 205 रुपयांपर्यंत प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंबाच्या (Pomegranate) 1613 क्रेट्सची आवक झाली. त्यामध्ये नंबर 1 ला 121 ते 205 रुपये, नंबर 2 ला 91 ते 120 रुपये, नंबर 3 ला 51 ते 90 रुपये, नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रतिकिलो असा भाव मिळाला. तसेच सीताफळाच्या 41 क्रेट्सची आवक झाली. त्यास 15 ते 85 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला.

- Advertisement -

याचबरोबर संत्रीच्या 50 क्रेट्सची आवक झाली. त्याला 5 ते 37 रुपये तर सरासरी 25 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. पेरूच्या 84 क्रेट्सची आवक झाली. त्यास 20 ते 40 रुपये तर सरासरी 30 रुपये भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वाढीव रकमेचा प्रस्ताव केंद्राकडे पाठवणार : कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

0
पुणे | प्रतिनिधी Pune राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे यापूर्वीच प्रस्ताव पाठवला असून, आता वाढीव रकमेचा प्रस्ताव पुन्हा पाठवण्यात येत असल्याचे कृषिमंत्री दत्तात्रय...