Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDindori : राज्य शासनाची दिवाळखोरीकडे वाटचाल : खा. सुप्रिया सुळे

Dindori : राज्य शासनाची दिवाळखोरीकडे वाटचाल : खा. सुप्रिया सुळे

ओझे | वार्ताहर Oze

महायुतीने विविध योजनांची घोषणा करत सत्ता मिळवली, मात्र आता या योजनांचे पैसे द्यायला या सरकारकडे पैसे नाहीत. विकासकामांना निधी नाही. राज्य शासनाची आर्थिक दिवाळखोरीकडे वाटचाल सुरू असल्याचे प्रतिपादन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले.

- Advertisement -

दिंडोरी तालुयातील खेडगाव येथे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचे अनावरण तसेच आरोग्य केंद्राच्या इमारतीचे पशुवैद्यकीय दवाखाना बहुउद्देशीय इमारत सांस्कृतिक भवन भव्य प्रवेशद्वार या विकासकामांचा शुभारंभ खासदार सुप्रिया सुळे, अन्न व औषध प्रशासन विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी खा. सुळे बोलत होत्या.

अध्यक्षस्थानी कादवा कारखान्याचे चेअरमन श्रीराम शेटे होते. यावेळी अन्न व औषध प्रशासनमंत्री नरहरी झिरवाळ यांनी खेडगाव येथील सरपंच दत्तात्रय पाटील यांचा सातत्याने पाठपुरावा असल्याने खेडगाव येथे विविध विकासकामे होत असल्याचे सांगितले. खा. भास्कर भगरे यांनी खासदार सुळे यांच्या नेतृत्वात संसदेत आपण सातत्याने शेतकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा करत असल्याचे सांगितले.

कादवाचे चेअरमन श्रीराम शेटे यांनीही मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच दत्तात्रेय पाटील यांनी करत विकासकामांचा आढावा घेत विकासासाठी सहकार्य करणार्‍या सर्वांचे आभार मानले. सूत्रसंचालन लक्ष्मण महाडिक व योगिता पवार यांनी केले. यावेळी उद्धव ठाकरे गट शिवसेना जिल्हाप्रमुख जयंत दिंडे, चिंतामण गावित, गोकुळ पिंगळे, शिवाजी बस्ते, सुखदेव जाधव, सुभाष शिंदे, बाळासाहेब जाधव, प्रशांत कड, वसंत कावळे, रावसाहेब संधान आदींसह ग्रामपंचायत सदस्य, महिला उपस्थित होत्या. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व कार्यकर्ते, ग्रामविकास अधिकारी थोरात, ढोकरे, राजेंद्र वाघ आदी कर्मचार्‍यांनी मेहनत घेतली.

झिरवाळ, तुम्ही आमच्यासाठी पक्षापलीकडे
ना. झिरवाळ, तुम्हाला आम्ही पक्षाचे मानत नाही. तुमची आमची बांधिलकी वेगळी आहे. मी काय सरकारबद्दल बोलतेय. तुम्ही जास्त मनावर घेऊ नका, असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तुमच्या निर्णयावर आमची काही तक्रार नाही, असेही सांगितले.


भुजबळांचे कौतुक, कोकाटेंवर हल्लाबोल
भुजबळ यांनीही जिल्ह्याचे नेतृव चांगले केल्याचे सांगितल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या तर दुसरीकडे मंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव न घेता नोटीस मुद्यावरून हल्ला चढवला. तुमच्या विचाराच्या कुणीतरी तुम्ही पत्ते खेळतानाचे व्हिडिओ काढून अब्रू काढली अन् तुम्ही त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा करण्यावजी रोहित पवारला काय नोटीस देता, असा सवाल खासदार सुप्रिया सुळे यांनी नाव न घेता मंत्री माणिकराव कोकाटे यांना विचारला.

ताज्या बातम्या

आदित्य

Aaditya Thackeray: एहसान फरामोश, विकाऊ, सडक्या वृत्तीचे…; आदित्य ठाकरेंकडून बंडखोर खासदारांचा...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना...