Friday, June 19, 2026
Homeब्रेकिंग न्यूजOmraje Nimbalkar: भावनिकदृष्ट्या चुकीचा, तरी…; अखेर ओमराजे निंबाळकरांनी सोडलं मौन, म्हणाले…

Omraje Nimbalkar: भावनिकदृष्ट्या चुकीचा, तरी…; अखेर ओमराजे निंबाळकरांनी सोडलं मौन, म्हणाले…

मुंबई | Mumbai
शिवसेना ठाकरे गटातील ६ खासदार फुटणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. यामध्ये संजय जाधव, संजय दिना पाटील, संजय देशमुख, नागेश पाटील आष्टीकर, भाऊसाहेब वाकचौरे आणि ओमराजे निंबाळकर यांचा समावेश आहे. खासदार ओमराजे निंबाळकर हे गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नॉट रिचेबल होते. यानंतर आता त्यांनी एका वृत्तापत्राला दिलेल्या मुलाखतीमधे आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

भावनिक दृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या योग्य
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी या प्रकरणी थेट भाष्य केले आहे. हा राजकीय निर्णय घेताना आपण मोठ्या धर्मसंकटात असल्याचे त्यांनी सांगितले. पक्ष सोडण्याचा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा असला तरी राजकीय दृष्ट्या योग्य आहे, असा दावा त्यांनी केला आहे. राजकीय अस्तित्वाचे संकट, विकासनिधीचा अभाव या सारखी कारणे निंबाळकर यांनी दिली आहेत. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याबाबतचा निर्णय २० जून नंतर घेणार असल्याचे निंबाळकर यांनी म्हटलेय.

- Advertisement -

कोरड्या हाताने किती दिवस फिरणार?
ओमराजे निंबाळकर यांनी दिलेल्या मुलाखतीत म्हंटेलय की, “सध्या माझ्या समोर सत्ता आणि पैसा आहे, तर माझ्याकडे केवळ पक्षाविषयीची निष्ठा आहे. मात्र, पक्षात निष्ठा असूनही जर मला माझ्या मतदारसंघातील लोकांची कामेच करता येत नसतील, तर मी कोणत्या तोंडाने लोकांसमोर जाऊ? शेवटी कोरड्या हाताने मी कधीपर्यंत फिरणार?” अशा उद्विग्न शब्दांत ओमराजे निंबाळकर यांनी आपली भावना व्यक्त केली.

Sanjay Raut: फुटीर खासदारांशी मोठी डील? कोणाला मंत्रीपद, तर कोणाला…; संजय राऊतांचा खळबळजनक दावा

ते पुढे म्हणाले की, खासदार असूनही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत स्वतःची माणसं निवडून येत नसतील, तर भविष्यात राजकीय अस्तित्व धोक्यात येऊ शकते. मतदारसंघात रस्ते, पूल, डीपी यांसारखी कामे करण्यासाठी वारंवार प्रस्ताव देऊनही कामे होत नसल्याची खंत व्यक्त केली. सत्ता आणि निधी नसल्याने लोकांची कामे करता येत नसल्याचे त्यांनी सांगितले.

निष्ठेच्या जोरावर टिकून राहणे अशक्य
सत्ताधारी महायुतीची ताकद, पैसा आणि कामांचा सपाटा यांसमोर केवळ निष्ठेच्या जोरावर टिकून राहणे अशक्य झाल्याचे सांगत, आता आपल्यासमोर दुसरा कोणताही पर्याय उरलेला नाही, असे स्पष्ट संकेत ओमराजे निंबाळकर यांनी दिले आहेत.

ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत
खासदार ओमराजे निंबाळकर यांनी महायुतीच्या नेत्यांच्या कार्यपद्धतीचे कौतुक करत आपल्याच पक्षाच्या सर्वोच्च नेतृत्वावर आणि कार्यपद्धतीवर थेट बोट ठेवले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे इतके संख्याबळ आणि आमदार असतानाही ते शांत बसलेले नाहीत, याकडे ओमराजेंनी लक्ष वेधले. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत या नेत्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि आता विधान परिषदेच्या निवडणुकीतही ते स्वतः मैदानात उतरून फिरत आहेत, असे निंबाळकर म्हणाले.

आदित्य ठाकरेंवर निशाणा
“पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना सध्या फिरणे शक्य नाही, हे मी समजू शकतो. पण किमान युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी तरी राज्याचा दौरा करायला हवा होता. त्यांनी फिरून कार्यकर्त्यांना ताकद दिली पाहिजे होती, पण दुर्दैवाने तसे झाले नाही,” असा थेट हल्लाबोल त्यांनी आदित्य ठाकरेंवर केला.

ताज्या बातम्या

आदित्य

Aaditya Thackeray: एहसान फरामोश, विकाऊ, सडक्या वृत्तीचे…; आदित्य ठाकरेंकडून बंडखोर खासदारांचा...

0
मुंबई | Mumbaiशिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या ६ खासदारांनी व्हीप धुडकावून बंडखोरी केल्यानंतर अखेर २४ तासांनी आदित्य ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. युवासेना...