Friday, July 24, 2026
HomeनाशिकNashik News : दिंडोरीत ‘व्हाईट’ बिबट्याची एंट्री

Nashik News : दिंडोरीत ‘व्हाईट’ बिबट्याची एंट्री

ऊस शेतीत सापडले बछडे, आईसोबत पुनर्भेट !

दिंडोरी | Dindori

दिंडोरी (Dindori) तालुक्यात प्रथमच पांढऱ्या रंगाचा बिबट्याचा बछडा (White Leopard Cub) आढळल्याने वनविभागासह नागरिकांमध्ये उत्सुकता पसरली आहे. 6 मार्च रोजी चाचडगाव शिवारातील ऊसशेतीत सापडलेल्या तीन नवजात बछड्यांपैकी एकाचा रंग चक्क पांढरा असल्याचे निदर्शनास आले. ही घटना नाशिक वनविभागासाठीही (Nashik Forest Department) पहिल्यांदाच नोंदली गेली आहे.

- Advertisement -

6 मार्चला ऊसतोड (Sugarcane Harvest) सुरु असताना शेतमजुरांना ऊसशेतीत तीन बछडे दिसले. माहिती मिळताच दिंडोरी वनपथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत तिन्ही पिल्लांचे ‘रेस्क्यू’ केले. त्यापैकी एका बछड्याची त्वचा पांढरी असून अंगावर हलके काळे ठिपके दिसत असल्याने अधिक तपासासाठी नाशिक डिव्हिजनच्या विशेष पथकाला बोलावण्यात आले.

पथकाने बछड्यांना ताब्यात घेऊन वैद्यकीय तपासणी केली असता ते अवघे दहा दिवसांचे असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर वनअधिकाऱ्यांनी संवेदनशीलतेने पावले उचलत बछड्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासात परत नेण्याचा निर्णय घेतला. त्याच दिवशी सायंकाळच्या सुमारास पथक पुन्हा चाचडगावातील शेतात पोहोचले. बछड्यांना टोपलीखाली सुरक्षित ठेवून परिसरात ट्रॅप कॅमेरे लावण्यात आले. रात्रीच्या वेळी बिबट्या मादी घटनास्थळी आली आणि तिन्ही बछड्यांना जबड्यात धरून सुरक्षित ठिकाणी हलवून नेले. ही संपूर्ण प्रक्रिया कॅमेऱ्यातही कैद झाली.

वनविभागाच्या या यशस्वी कारवाईमुळे बछड्यांचे प्राण वाचले असून आईसोबत त्यांची सुखरूप पुनर्भेट घडवून आणण्यात आली. दिंडोरीत प्रथमच पांढऱ्या बिबट्याचा बछडा आढळल्याने हा विषय सध्या चर्चेचा ठरला आहे.

ताज्या बातम्या

Crime News : एलसीबीचे जुगार, बिंगो व अवैध दारू अड्ड्यांवर छापे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar अवैध धंद्यांविरोधात स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) कारवाई करत एमआयडीसी व श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत जुगार, बिंगो आणि अवैध दारू व्यवसायावर एकाच...