Friday, July 19, 2024
Homeक्राईममोठी बातमी! दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नितेश राणेंची चौकशी होणार? मुंबई पोलिसांकडून नोटीस

मोठी बातमी! दिशा सालियन मृत्यूप्रकरणात नितेश राणेंची चौकशी होणार? मुंबई पोलिसांकडून नोटीस

मुंबई | Mumbai
दिशा सालियन मृत्यू प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूत याची माजी मॅनेजर दिशा सालियन मृत्यूप्रकरणाच्या चौकशीला पुन्हा एकदा वेग येण्याची शक्यता आहे. आता दिशा सालियन मृत्यूप्रकरणात भाजप नेते नितेश राणेंची चौकशी होणार आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशाच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती.

- Advertisement -

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपुतची एक्स मॅनेजर दिशा सालियनचे मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन हिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणात चौकशीची मागणी केली होती. दिशा सालियन हिची आत्महत्या नसून हत्या आहे, असा दावा राणे यांनी केला होता. याची संपूर्ण चौकशी करावी, अशी मागणी नागपूर अधिवेशनात केली होती. यानंतर दिशा सालियन हत्येप्रकरणी आपल्याकडे पुरावे असल्याचाही नितेश राणे यांचा दावा होता. त्यामुळे आता मुंबई पोलिसांकडून नितेश राणे यांना चौकशीसाठी हजर राहण्याची नोटीस बजावण्यात आली आहे.

दरम्यान, दिशा सालियान प्रकरणात माझ्याकडे पुरावे आहेत. त्या हिंदू मुलीवर बलात्कार झाला आणि तिचा खून झाला. याची सगळी माहिती माझ्याकडे आहे, सीसीटिव्ही फुटेज, रजिस्टरचे कागद फाडण्यात आले. मी पोलिसांना सगळी माहिती देण्यासाठी तयार आहे. मी मुंबई पोलीस आणि SIT समोर सगळे पुरावे देणार असल्याचे नितेश राणे यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आता मुंबई पोलीस आमदार नितेश राणेंची चौकशी करणार असून यामध्ये काय महत्त्वाची माहिती समोर येणार? राणे काय पुरावे सादर करणार हे पाहणं महत्त्वाच ठरणार आहे.

व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या