Monday, September 28, 2026
HomeनगरJamkhed : डीजे बंद केल्याच्या वादातून नान्नजमध्ये जीवघेणा हल्ला

Jamkhed : डीजे बंद केल्याच्या वादातून नान्नजमध्ये जीवघेणा हल्ला

कोयता, रॉड, दगड व काठ्यांनी मारहाण

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

नान्नज येथे यात्रोत्सवादरम्यान डीजे बंद केल्याच्या कारणावरून झालेल्या वादातून इस्माईल ऊर्फ बाबा मेहमुद शेख (वय 37, रा. पेठ गल्ली, नान्नज) यांच्यावर कोयता, लोखंडी रॉड, काठ्या, दगड व विटांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला. रविवारी (दि. 27 जुलै) रात्री 10.15 वाजता झालेल्या हल्ल्यात शेख गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर समर्थ हॉस्पिटल, जामखेड येथे उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

नान्नज बाजारतळावरील नृत्याचा कार्यक्रम पोलिसांच्या आदेशाने बंद झाल्यानंतर डीजे चालकाला जाण्यास सांगत असताना लक्ष्मण ऊर्फ पिर्‍या बबन काळे (रा. आरोळेवस्ती, जामखेड), अनुराग ऊर्फ सोनू उमेश डाडर व तीन-चार अनोळखी इसमांनी डीजे पुन्हा सुरू करण्याची मागणी केली. पोलिसांनी डीजे बंद केल्याचे सांगितल्यावर आरोपींनी शेख यांना शिवीगाळ करून मारहाण केली.

लक्ष्मण काळे याने कोयत्याने डोक्यावर, तोंडावर व पाठीवर वार केले, तर अनुराग डाडर याने लोखंडी रॉडने मारहाण केली. इतरांनी काठ्या व दगडांनी हल्ला केला. शेख यांचा भाचा आझम इम्रान पठाण व ग्रामस्थांनी त्यांना खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. नागरिकांची गर्दी होताच आरोपी पसार झाले.
दरम्यान, हल्लेखोरांनी शिवाजी चौकातील एका कार्यक्रमस्थळी जाऊन डीजेच्या गाडीच्या काचा फोडून कोयत्याने वार करून नुकसान केल्याचाही आरोप आहे.

इस्माईल मेहमुद शेख यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण ऊर्फ पिर्‍या बबन काळे, अनुराग ऊर्फ सोनू उमेश डाडर व तीन-चार अनोळखी इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर व पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजित मोरे करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आर्थिक फसवणुकीपुरती (Fraud) मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्येपर्यंत (Suicide) ढकलण्यापर्यंत पोहोचली आहे. अंबड एमआयडीसी भागात...