Sunday, September 6, 2026
Homeक्राईमCrime News : पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

Crime News : पूर्ववैमनस्यातून युवकावर धारदार शस्त्राने हल्ला

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

- Advertisement -

शहरातील हॉटेल कॉर्नवेल परिसरात जुन्या भांडणाच्या कारणातून युवकावर धारदार शस्त्र आणि लाकडी दांडक्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. विशालभाऊ साळवे (वय 20, रा. नीलक्रांती चौक, अहिल्यानगर) असे जखमी युवकाचे नाव असून त्याच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. त्याने दिलेल्या जबाबावरून तोफखाना पोलीस ठाण्यात चौघांविरूध्द सोमवारी (23 फेब्रुवारी) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सार्थक ठोंबरे, यश कांडेकर, कुणाल परभणे, राधेश्याम आजबे (पूर्ण नावे, पत्ता माहिती नाही) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी विशाल याचे संशयित आरोपींसोबत शिवजंयतीच्या दिवशी न्यू आर्ट्स कॉलेज येथे गाणे लावण्याच्या कारणातून वाद झाले होते. रविवारी (22 फेब्रुवारी) रात्री विशाल याला सार्थकचा फोन आला व तो म्हणाला, आपण जुने भांडण मिटवून घेऊ, तू हॉटेल कॉर्नवेल येथे ये, यानंतर विशाल तेथे पोहोचताच संशयित आरोपींनी त्याला गाठले.

यश कांडेकर याने विशालच्या डोक्यावर धारदार शस्त्राने वार करून जखमी केले. त्याचवेळी कुणाल परभणे याने लाकडी दांडक्याने विशालच्या पाठीवर व हातावर जबर मारहाण केली. या हल्ल्यात सार्थक ठोंबरे आणि राधेशाम आजबे यांनीही विशालला मारहाण करत जमिनीवर आपटले. शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकीही दिली. पोलिसांनी चौघांविरूध्द गुन्हा नोंदवला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

राज-का-रण : पप्पू पास हो गया..

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत'- संपादक काँग्रेस पक्षाने आपल्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यास सुरुवात केली, याचे एक उत्तम आणि आश्वासक उदाहरण नुकतेच नाशिकमध्ये...