Thursday, March 13, 2025
Homeनगरनिम्मा वेळ संगमनेरविषयी, तर निम्मा महावितरणच्या चर्चेवर

निम्मा वेळ संगमनेरविषयी, तर निम्मा महावितरणच्या चर्चेवर

नियोजन समितीच्या बैठकीत आमदारांनी मांडले विविध प्रश्न

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत शनिवारी नगरला झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीचा निम्मा वेळ संगमनेर तालुक्यातील तर निम्मा जिल्ह्यातील महावितरणच्या कामावर नाराजी व्यक्त करण्यात खर्च झाला. यावेळी नाशिक शिक्षक मतदारसंघाचे आ. सत्यजित तांबे, आ. अमोल खताळ, आ. काशिनाथ दाते, आ. विठ्ठलराव लंघे आ. हेमंत ओगले यांच्यासह आमदारांनी विविध विषय उपस्थित केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात विद्यमान सरकारच्या काळातील पहिली नियोजन समितीची बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील प्रमुख अधिकारी यांच्यासह आमदार शिवाजीराव गर्जे, आ. सत्यजित तांबे, आ. मोनिका राजळे, आ.आशुतोष काळे, डॉ.किरण लहामटे, आ. विठ्ठल लंघे, आ.काशिनाथ दाते, आ.हेमंत ओगले, आ. अमोल खताळ उपस्थित होते. बैठकीत कालव्याची दुरुस्ती, वीज खंडित होण्याची समस्या, रेल्वे हद्दीतील अतिक्रमणे, सोलर वीज पंप योजना, नगरपालिका क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारणे, अंमली पदार्थांच्या विक्रीला प्रतिबंध आदी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

बैठकीत सुरूवातीला जिल्ह्यातील शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहांचा विषय आ. तांबे यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी तालुका पातळीवरील शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृह सोडा जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेवर प्रश्न उपस्थित केला. आ. तांबे यांच्यासह आ.खताळ यांनी बिबट्यांचा मानवी वस्तीमधील वाढता शिरकाव पाहता त्यांची नसबंदी करण्याची मागणी केली. तसेच संगमनेर तालुक्यात जलसंधारणाच्या कामाला मंजुरी मिळालेली असताना ती अद्याप सुरू झालेली नाही, याकडे लक्ष वेधले.

आ. काशिनाथ दाते यांनी महावितरण कंपनीच्या कारभारावर बोट ठेवले. शेतकर्‍यांना शेतीसाठी नवीन वीज जोड उपलब्ध होत नाही. अनेक ठिकाणी विजेच्या रोहित्रांवरील लोड वाढत आहे. ग्रामीण भागात गेल्या महिनाभरापासून शेतकर्‍यांना पुरेशा दबाने वीजपुरवठा होत नाही. नवीन विजेच्या कनेक्शनची मागणी केली असता सोलर पंपाकडे बोट दाखविण्यात येत आहे. संगमनेर तालुक्यात सर्व बाबींची पुर्तता केल्यानंतर महावितरणकडून ‘डार्क झोन’ची अट पुढे करण्यात आली. महावितरणच्या धरसोड वृत्तीमुळे शेतकर्‍यांचे नुकसान होत असल्याचे आ. दाते यांच्यासह अन्य आमदारांनी पालकमंत्री विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिले.

आ. ओगले यांनी श्रीरामपूर तालुक्यातील अतिक्रमणाचा मुद्दा उपस्थित करत याठिकाणी काढण्यात येणारे अतिक्रमण हे 50 वर्षांपूर्वीचे आहे. याठिकाणी अतिक्रमण होते तर संबंधितांना वीज आणि पाण्याचे कनेक्शन दिलेच कसे. यासह काढण्यात येणार्‍या अतिक्रमणधारकांचे पुनर्वसन करण्याची मागणी केली. आ. लंघे यांनी जायकवाडी बॅक वॉटर प्रकल्पातील शेतकर्‍यांच्या पुनर्वसनाचा विषय मांडला. सरकारच्या सुधारीत धोरणामुळे 50 वर्षे झालेल्या शेतकर्‍यांना आता पुनर्वसनाचा लाभ मिळणार नसल्याचे यावेळी निदर्शनास आणून दिले. आ. तांबे यांनी संगमनेर शहराच्या हद्दीतील बंद असणार्‍या सीसीटीव्ही देखभाल दुरस्तीचा विषय उपस्थित केला. तसेच संगमनेर बसस्थानक परिसरातील अश्वारूढ शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 2023 मध्ये झालेल्या नियोजन समितीच्या बैठकीत एक कोटी रुपयांची घोषणा करण्यात आली होती. मात्र, यावर पुढे कोणतीही कार्यवाही झाली नसल्याचा मुद्दा मांडला.

नाराजी अन् कडक शब्दांत सूचना
नियोजन समितीच्या बैठकीत शासकीय कार्यालयातील स्वच्छतागृहाचा विषय समोर आल्यानंतर पालकमंत्री विखे पाटील यांनी स्वत: नगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयातील स्वच्छतागृहाची पाहणी केली. तसेच याठिकाणी असणार्‍या अस्वच्छेबाबत नाराजी व्यक्त करत पालकमंत्री यांनी संबंधितांना कडक शब्दांत सूचना दिल्या. यामुळे जिल्हा प्रशासनातील अधिकार्‍यांची काही काळ त्रेधातिरपिट उडाली.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...