Monday, September 28, 2026
HomeनगरJamkhed : जमीन वाद, धमक्यांना कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

Jamkhed : जमीन वाद, धमक्यांना कंटाळून शेतकर्‍याची आत्महत्या

मृत्यूपूर्वीच्या व्हिडिओत दोघांवर आरोप

जामखेड |प्रतिनिधी| Jamkhed

जमीन बळकावण्याचा प्रयत्न व शेतातील विजेच्या पोलवरून मिळणार्‍या धमक्यांना कंटाळून दरडवाडी (ता. जामखेड) येथील विकास साहेबराव रणसिंग (वय 40) यांनी रविवारी (दि. 26 जुलै) राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. कुटुंबीयांनी त्यांना खर्डा येथील लाड हॉस्पिटलमध्ये नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणल्यानंतर पत्नी विद्या रणसिंग यांनी विकास यांचा मोबाईल तपासला असता आत्महत्येपूर्वीचे व्हिडिओ आढळले. त्यात महादेव गोवर्धन दराडे (रा. दरडवाडी) यांच्यावर 6 गुंठे जमीन बळकावल्याचा व काही महिन्यांपूर्वी डोक्यात बाटली मारल्याचा, तर चतुर्भुज दाताळ (रा. बाळगव्हाण) यांच्याशी शेत, बांध व विजेची लाईन नेण्यावरून वाद असल्याचा आरोप केला. दोघांकडून मिळणार्‍या धमक्यांना कंटाळून आत्महत्या करत असल्याचे त्यांनी व्हिडिओत म्हटले आहे.

- Advertisement -

गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी मृतदेह खर्डा पोलीस ठाण्यात आणल्यानंतर अण्णाभाऊ साठे क्रांती सेनेचे पुणे जिल्हाध्यक्ष अनिल कांबळे यांच्या नेतृत्वाखाली जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला. कर्जतचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुजितकुमार क्षीरसागर यांनी भेट देऊन नातेवाईकांची समजूत काढली. त्यानंतर विद्या विकास रणसिंग (वय 36) यांच्या फिर्यादीवरून महादेव गोवर्धन दराडे व चतुर्भुज दाताळ यांच्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. सहाय्यक पोलीस निरीक्षक उज्वलसिंह राजपूत व पोलीस उपनिरीक्षक अशोक खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस पुढील तपास करीत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : वर्गमित्राकडून व्हिडिओ रेकॉर्डिंग; त्रासाला कंटाळून महिलेची...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik आर्थिक फसवणुकीपुरती (Fraud) मर्यादित राहिलेली सायबर गुन्हेगारी आता वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त करून आत्महत्येपर्यंत (Suicide) ढकलण्यापर्यंत पोहोचली आहे. अंबड एमआयडीसी भागात...