Thursday, April 2, 2026
Homeक्राईमCrime News : डीजे बंद करण्यास सांगितल्याने पोलिसांशी झटापट

Crime News : डीजे बंद करण्यास सांगितल्याने पोलिसांशी झटापट

आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

भोसले आखाडा परिसरात हळदीच्या कार्यक्रमात, नियमांचे उल्लंघन करत मोठ्या आवाजात डीजे वाजवल्याने पोलिसांनी तो बंद करण्यास सांगितल्यावर, आयोजकांनी थेट पोलिसांशीच अरेरावी व झटापट केल्याची घटना शुक्रवारी (दि. 12) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी डीजे मालकासह आठ जणांविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणी आणि ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

शुक्रवारी रात्री पोलीस संदीप साठे हे त्यांच्या सेक्टर ड्युटीवर कार्यरत असताना, त्यांना उपनिरीक्षक गणेश देशमुख यांनी भोसले लॉनच्या पाठीमागे डीजे सुरू असल्याची माहिती दिली. त्यानुसार साठे व सहकारी घटनास्थळी पोहोचले. तेथे डीजेच्या तालावर काहीजण नाचत होते. देशमुख यांनी डीजे बंद करून शांतता राखण्याची सूचना केली. मात्र, काही युवकांनी देशमुख यांच्याशी अरेरावी करत त्यांच्या अंगावर धाव घेतली. इतर पोलीस कर्मचार्‍यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता, त्यांच्यासोबतही झटापट करण्यात आली आणि पोलिसांना शिवीगाळ करण्यात आली. यावेळी, हळद असलेली वधूने पोलिसांसमोर येऊन, आम्ही डीजे बंद करणार नाही, तुम्हाला जे करायचे ते करा, असे आव्हान दिले आणि ती आपल्या दूरध्वनीने चित्रीकरण करू लागली. त्यानंतर तिच्यासह इतर सात ते आठ युवकांनी आणि काही महिलांनी पोलिसांशी झटापट केली.

परिणामी, पोलिसांनी बळाचा वापर करून सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले. तसेच, डीजेचा टेम्पो आणि जनरेटर जप्त केले. चौकशीत डीजे मालक विकी माने हा देखील तेथे उपस्थित होता आणि त्यानेही पोलिसांशी अरेरावी करून नंतर तो पळून गेल्याचे समोर आले. पोलिसांनी शासकीय कर्तव्य पार पाडण्यास अडथळा आणल्याप्रकरणी आणि ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी रोहित भालेराव, इन्तीयाज बागवान, ईश्वर धिवर, हर्षल गायकवाड, तुषार घायमुक्ते, मच्छींद्र घायमुक्ते, विकी माने आणि वधू यांच्याविरुद्ध कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

केंद्र

Central Government: अमेरिका-इराण युद्धाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; खत-रसायन उद्योगाला...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiगेल्या एक महिन्यापासून सुरू असलेले अमेरिका-इराण युद्ध अद्यापही पूर्णपणे थांबायचे नाव घेत नाही. मात्र, हे युद्ध थांबवण्यासाठी सध्या हालचाली...