राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
राहाता कृषी उत्पन्न बाजार समितीत (Rahata Market Committee) मंगळवारी कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 5200 रुपये भाव मिळाला. बाजार समितीत कांद्याच्या (Onion) 2814 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर 1 ला 3900 ते 5200 रुपये, नंबर 2 ला 2400 ते 3850 रुपये, तर नंबर 3 ला 1000 ते 2350 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांद्याला (Onion) 1500 ते 4000 रुपये, तर जोड कांद्याला (Onion) 800 ते 1600 रुपये भाव मिळाला.
डाळिंबाच्या (Pomegranate) 2181 क्रेट्सची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला प्रतिकिलो 131 ते 205 रुपये, नंबर 2 ला 91 ते 130 रुपये, नंबर 3 ला 41 ते 90 रुपये, तर नंबर 4 ला 10 ते 40 रुपये भाव मिळाला. सीताफळाच्या 83 क्रेट्सची आवक झाली. त्याला प्रतिकिलो 10 ते 70 रुपये भाव मिळाला. संत्र्याच्या 67 क्रेट्सची आवक झाली. त्याला 5 ते 30 रुपये भाव मिळाला.




