Sunday, June 14, 2026
Homeक्राईमSangamner : तपासण्याच्या बहाण्याने डॉक्टराकडून महिलेशी असभ्य वर्तन

Sangamner : तपासण्याच्या बहाण्याने डॉक्टराकडून महिलेशी असभ्य वर्तन

संगमनेर शहर पोलिसांनी डॉक्टरला केली अटक

संगमनेर |तालुका प्रतिनिधी| Sangamner

संगमनेर शहरापासून काही अंतरावर असलेल्या एका गावात एका डॉक्टराने रुग्ण म्हणून आलेल्या महिलेचे टॉन्सिल तपासण्याचा बहाणा करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले अशी खळबळजनक घटना मंगळवारी दि. 22 जुलै रोजी रात्री आठच्या सुमारास घडली. या प्रकरणी संबंधित डॉक्टरविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपी डॉक्टरला तत्काळ अटक केली आहे.

- Advertisement -

शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, डॉ. राहुल विश्वनाथ इंगळे (रा. सुकेवाडी, ता. संगमनेर) यांचे ‘इंगळे क्लिनिक’ नावाचा खासगी दवाखाना आहे. मंगळवारी रात्री आठच्या सुमारास महिला तिच्या मुलासोबत क्लिनिकमध्ये टॉन्सिल दुखत असल्याने तपासणीसाठी त्या डॉक्टरांकडे गेल्या होत्या.

तपासणीच्या बहाण्याने डॉक्टर इंगळे यांनी महिलेची वैद्यकीय मर्यादा ओलांडणारी छेडछाड केली आणि तिची लज्जा भंग होईल असे कृत्य केल्याचे पीडित महिलेने पोलिसांना दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलिसांनी डॉ. राहुल इंगळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याला अटकही करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

शेत रस्त्याच्या वादातून तरुणास मारहाण

0
मानूर | वार्ताहर Manur कळवण तालुयातील भादवण शिवारात शेतजमिनीच्या वहिवाट रस्ता वादातून एका तरुणासह त्याच्या वडिलांना मारहाण केली. यामुळे मारहाण झालेल्या युवकाने विष घेत आत्महत्या...