Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजडॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी घेतली दखल; सातारा एसपींना फोन करत दिला आदेश,...

डॉक्टर आत्महत्येप्रकरणी CM फडणवीसांनी घेतली दखल; सातारा एसपींना फोन करत दिला आदेश, PSIला तत्काळ…

सातारा | Satara
साताऱ्यातील फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टरच्या आत्महत्येच्या प्रकरणाने आता धक्कादायक वळण घेतले आहे. आत्महत्या केलेल्या महिला डॉक्टरने तिच्या हातावरच आत्महत्येचे कारण लिहिले असल्याचे समोर आले असून, त्यात दोन जणांवर लैंगिक अत्याचार आणि मानसिक छळाचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. या घटनेमुळे महाराष्ट्र हादरला असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेतली आहे.

फलटण उपजिल्हा रुग्णालयातील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणाची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून घेतली आहे. त्यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्याला तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याचेही निर्देश देण्यात आले आहे. यानंतर पोलिसांकडून गोपाळ बदनेचे तत्काळ निलंबन करण्यात आले आहे.

- Advertisement -

नेमके काय घडले?
डॉ. संपदा मुंडे नावाच्या डॉक्टर आणि जिल्हा पोलिसांमध्ये वैद्यकीय तपासणीवरून सुरू असलेल्या वादातून हे घडल्याची सूत्रांची माहिती आहे. दोन्ही पक्षांमध्ये यापूर्वी वाद झाला होता, त्यानंतर डॉक्टरविरुद्ध विभागीय चौकशी देखील सुरू करण्यात आली होती, असे सांगितले जात आहे.

डॉ. मुंडे यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून आपल्याला अन्यायपूर्ण वागणूक दिली जात आहे आणि जर कथित गैरवर्तन थांबले नाही तर आत्महत्या करण्याची धमकी दिली होती, असे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी याप्रकरण चौकशी सुरु असल्याचे सांगितले आहे.

हातावर सुसाईड नोट लिहिली
“माझ्या मरण्याचे कारण पोलीस निरीक्षक गोपाल बदने आहे, ज्याने माझ्यावर ४ महिने बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागील ४ महिने शारिरीक आणि मानसिक छळ केला,” असे तिने हातावरील सुसाईट नोटमध्ये लिहिले आहे.

एसपींनी काय माहिती दिली?
याबाबत सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी म्हणाले की, आम्ही या प्रकरणात गुन्हा दाखल केलेला आहे. एका आरोपीचे नाव पीएसआय गोपाल बदने आहे. तो फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनचा आहे. दुसरा आरोपी प्रशांत बनकर आहे. तो पोलीस नसून तो सामान्य नागरिक आहे. या प्रकरणात आम्ही गोपाल बदने याला निलंबित करत आहोत. या दोघांना अटक करण्यासाठी पोलीस पथक रवाना करण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कडक कारवाईच्या सूचना दिलेल्या आहेत. आरोपींना तात्काळ अटक करायची आणि जी काही कारवाई आहे ती करण्याचे स्पष्ट आदेश दिले आहेत.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

शाळा

Maharashtra Schools: राज्यातील शाळा १५ की २२ जूनला सुरु होणार? शिक्षण...

0
मुंबई | Mumbaiतब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय...