Sunday, June 14, 2026
Homeब्रेकिंग न्यूजNashik Vidhan Parishad Election : गोकुळ गितेंचे बंड थंड होणार? दराडे बंधूंनी...

Nashik Vidhan Parishad Election : गोकुळ गितेंचे बंड थंड होणार? दराडे बंधूंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट, काय ठरलं?

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) भाजपचे माजी स्थायी सभापती गणेश गिते (Ganesh Gite) यांचे बंधू गोकुळ गिते यांनी बंडखोरी कायम ठेवल्याने महायुतीचे अधिकृत उमेदवार, शिवसेना शिंदे गटाचे नरेंद्र दराडे यांच्यापुढे अजूनही पेच आहे. दरम्यान, मंगळवारी दराडे बंधूनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत जाऊन भेट घेतली. गोकुळ गिते हे बुधवारी दराडे यांना पाठिंबा देण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

बंडखोरी रोखण्यासाठी भाजपचे संकटमोचक गिरीश महाजन (Girish Mahajan) उद्योगमंत्री उदय सामंत आणि पालकमंत्री दादा भुसे या तीन दिग्गज मंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले होते. गोकुळ गिते यांचे बंधू गणेश गिते हे मंत्री गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय मानले जातात. महाजन यांनी थेट चर्चा करूनही गोकुळ गिते माघार घेण्यास तयार झाले नाहीत.

दरम्यान, गणेश गिते हे महाजनांचे निकटवर्तीय असूनही गोकुळ गिते (Gokul Gite) माघार घेत नसल्याने ही बंडखोरी मंत्री महाजन यांनीच घडवून आणल्याची शंका शिंदे गटातून व्यक्त होत आहे. याबाबत शिंदे सेनेच्या मंत्र्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रार केल्याचेही समजते.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे व आमदार किशोर दराडे यांनी मंगळवारी थेट मुंबई गाठली. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बराच वेळ चर्चा केली.

उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर आता रिंगणात केवळ दोनच उमेदवार उरले आहेत. महायुतीचे (Mahayuti) नरेंद्र दराडे आणि बंडखोर गोकुळ गिते. गिते यांच्या बंडखोरीमुळे महायुतीची मते विभागली जाण्याची भीती असून, त्याचा फटका दराडेंना बसू शकतो. त्यामुळे शिंदे गट (Shinde Group) आता अत्यंत सावध पावले टाकत आहे. नाशिकच्या (Nashik) या जागेवरील तिढा सोडवण्यात महायुतीला आलेले अपयश चर्चेचा विषय ठरला आहे.

ताज्या बातम्या

Nashik Vidhan Parishad Election : महायुतीचा ‘हॉटेल पॉलिटिक्स’वरती भर; तर मविआत...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात निवडणुकीत (Nashik Vidhan Parishad Election) आकडे पाहिले तर महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे (Narendra...