Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजSunetra Pawar: वर्धापन दिन साजरा करताना मनात वेगळीच…; राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनी...

Sunetra Pawar: वर्धापन दिन साजरा करताना मनात वेगळीच…; राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनी सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट

मुंबई | Mumbai
महाराष्ट्राच्या राजकारणानं गेल्या चार ते पाच वर्षांमध्ये अनेक घडामोडी पाहिल्या. मोठ्या पक्षांमध्ये मतभेद झाले, दुफळी माजली, पक्षाचे दोन भागही झाले. शरद पवार यांची राष्ट्रवादीसुद्धा यास अपवाद ठरली नाही. अजित पवारांनी आपली वेगळी वाट निवडत राज्याच राजकारणात एका नव्या पर्वाची सुरुवात केली. मात्र अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा झटका बसला. अजित पवारांनंतर त्यांच्या पक्षाची जबाबदारी त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या खांद्यावर आली आहे.

असे असतानाच अजित पवारांच्या जाण्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा आज पहिला वर्धापन दिन असून याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी X वर एक पोस्ट लिहीली आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया, असे आवाहन त्यांनी या पोस्टद्वारे केले आहे. प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमाने काम करण्याचा संकल्प करूया असेही त्यांनी पोस्टमध्ये नमूद केले.

- Advertisement -

मनात वेगळीच भावना दाटून येते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनानिमित्त पक्ष परिवारातील ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, समर्थक आणि हितचिंतकांना मनःपूर्वक शुभेच्छा!
शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या पुरोगामी विचारांचा वारसा तसेच स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांनी घालून दिलेल्या सुसंस्कृत, लोकाभिमुख आणि विकासाभिमुख राजकारणाच्या पायावर उभा राहिलेला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आज आपल्या यशस्वी प्रवासाची २७ वर्षे पूर्ण करत आहे. या प्रवासात असंख्य नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जनतेने पक्षाला दिलेली साथ हीच आमची खरी ताकद राहिली आहे, अस त्यांनी लिहीलं.
पण यंदाचा वर्धापन दिन साजरा करताना मनात एक वेगळीच भावना दाटून येते. कारण आज आदरणीय अजित दादा आपल्यात नाहीत…

चूक झाली तर कान धरून समजावणारे
सभागृहात भाषणं होतील, कार्यकर्त्यांचे मेळावे होतील, पक्षाचा झेंडा तितक्याच अभिमानानं फडकेल, पण प्रत्येक क्षणी एक पोकळी जाणवत राहील. दादा हे फक्त पक्षाचे नेते नव्हते, तर ते आधारवड होते. कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य नागरिकांच्या सुख-दुःखात धावून जाणारे, संकटात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे, चूक झाली तर कान धरून समजावणारे आणि चांगलं काम केलं तर पाठीवर कौतुकाची थाप देणारे दादा प्रत्येकाच्या आयुष्याचा भाग बनले होते. त्यांनी जपलेला माणूस हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू होता, असंही सुनेत्रा पवार यांनी पोस्टमध्ये नमूद केलं.

संपादकीय : १० जुन २०२६ – मोदींची तपपूर्ती अन् ‘इंडिया’ची वज्रमूठ

आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या २७ व्या वर्धापन दिनी, दादांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन करत, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा निर्धार करूया. शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या विचारांतून प्रेरणा घेऊन आणि स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या पुरोगामी वाटेवर चालून अधिक सक्षम, समृद्ध आणि प्रगत महाराष्ट्र घडवण्यासाठी नव्या जोमानं काम करण्याचा संकल्प करूया, असं त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहीलं.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून शरद पवारांचा सरकारवर हल्लाबोल; म्हणाले…

0
मुंबई । Mumbai "ज्या देशात अन्नदाता सुखी नसतो, तो देश कधीच प्रगती करू शकत नाही. परंतु आज आपल्या महाराष्ट्रात दुर्दैवाने उलटे चित्र पाहायला मिळत आहे....