Wednesday, June 10, 2026
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Schools: राज्यातील शाळा १५ की २२ जूनला सुरु होणार? शिक्षण विभागाचा...

Maharashtra Schools: राज्यातील शाळा १५ की २२ जूनला सुरु होणार? शिक्षण विभागाचा महत्वाचा निर्णय

मुंबई | Mumbai
तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस बाकी असताना शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जून उजाडला तरी राज्यात अद्याप उन्हाच्या झळा कमी झालेल्या नाहीये. त्यामुळे तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे शाळा सुरू करण्याच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे.

शिक्षण विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार विदर्भातील शाळा २२ जूनपासून सुरू केल्या जाणार असून, उर्वरित राज्यभरातील शाळा १५ रोजी सुरु होतील. तीव्र उष्णतेच्या लाटेमुळे विदर्भातील शाळांबाबत हा निर्णय घेण्यात आला आहे. विदर्भातील शाळा २२ जून ते ३० जूनपर्यंत सकाळच्या सत्रात सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिलेत. विदर्भ वगळता राज्यातील सर्व शाळा १५ जून रोजी सुरू होणार आहेत.

- Advertisement -

Sunetra Pawar: वर्धापन दिन साजरा करताना मनात वेगळीच…; राष्ट्रवादी काँग्रेस वर्धापन दिनी सुनेत्रा पवारांची भावूक पोस्ट

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली. विभागीय शिक्षण उपसंचालक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणाधिकारी, शिक्षण निरीक्षक यांना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत.

राज्यातील शाळांना २ मे पासून उन्हाळी सुट्टी देण्यात आली होती. परंतु यंदा तापमानात कमालीची वाढ झाली होती. बहुतेक जिल्ह्यांमधील तापमानाचा पारा ४२- ४४ च्या पुढे होता, ब्रम्पुरीमध्ये काही दिवसांपूर्वी ४७.२ अंश सेल्सिअस एवढ्या विक्रमी तापमानाची नोंद झाली आहे. त्यादृष्टीकोनातून शाळा उशिराने सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. राज्य मंडळाच्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांना हा निर्णय लागू करण्याचे आदेश दिलेत.

उष्णतेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन विशेष नियोजन करण्याचे पत्र पाठवण्यात आले आहे. 1 जुलै 2026 पासून शाळा नियमित वेळेनुसार सुरू होणार आहेत. उर्वरित महाराष्ट्रात 15 जूनपासून नियमित वेळेत शाळा सुरू राहतील, याबाबत प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे याबाबत माहिती दिली.

ताज्या बातम्या

नरेंद्र

PM Narendra Modi: जनसेवा हीच सुशासनाची मोठी कसोटी…; पंतप्रधान नरेंद्र मोदींची...

0
नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhiभारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एनडीए सरकारचा १२ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला आहे. याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारताच्या...