नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दावा केला आहे की भारताने रशियाकडून तेल खरेदी थांबवली आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिका आणि भारतातील रणनीतिक भागीदारीचा मोठा टप्पा असल्याचे म्हटले. ट्रम्प यांनी त्यांच्या पहिल्या आशिया दौऱ्यात आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्याच्या पार्श्वभूमीवर हे विधान केले आहे. ट्रम्प यांनी हा निर्णय अमेरिका आणि भारतातील रणनीतिक भागीदारीचा मोठा टप्पा असल्याचे म्हटले. मात्र भारताने तत्काळ या दाव्याला खोटे ठरवत स्पष्ट केले की, तेल खरेदी हा भारताचा राष्ट्रीय हितांवर आधारित स्वतंत्र निर्णय आहे आणि कोणत्याही बाह्य दबावापुढे भारत झुकणार नाही.
वाढवलेले टॅरिफ आणि भारताने रशियाकडून तेल खरेदी सुरू ठेवल्याने गेल्या काही दिवसांपासून भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापारी संबंध ताणले गेले आहेत. रशियाकडून तेल खरेदी केल्याने ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के शुल्क लादले आहे. तसेच त्यांनी भारतावर युक्रेनमधील युद्धाला पाठबळ दिल्याचा आरोपही केला आहे.
ट्रम्प प्रशासनाने रशियाच्या दोन प्रमुख तेल कंपन्यांवर Rosneft आणि Lukoil वर कठोर आर्थिक आणि वित्तीय निर्बंध लादले आहेत.
भारताची ठोस भुमिका
मीडिया रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प यांच्या वक्तव्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या सूत्रांनी स्पष्ट केले की, भारत रशियाकडून कच्चे तेल खरेदी सुरू ठेवणार आहे. जोपर्यंत संयुक्त राष्ट्र स्तरावर अधिकृत निर्बंध लागू होत नाहीत, तोपर्यंत कोणताही देश भारताला कोणत्या देशाकडून तेल घ्यायचे, हे ठरवू शकत नाही. ऊर्जा मंत्रालयातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भारतासाठी स्वस्त आणि स्थिर तेल पुरवठा ही सर्वोच्च प्राथमिकता आहे. आम्ही आपल्या ऊर्जा सुरक्षेवर तडजोड करू शकत नाही.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा





