Saturday, April 25, 2026
Homeदेश विदेशDonald Trump: ते इथे येतात, मुलं जन्माला घालतात अन्…; ट्रम्प यांची भारतविरोधी...

Donald Trump: ते इथे येतात, मुलं जन्माला घालतात अन्…; ट्रम्प यांची भारतविरोधी संतपाजनक पोस्ट, म्हणाले, ‘नरकसदृश’ ठिकाणांहून…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबत युद्ध सुरू करून जगाला संकटात टाकले आहे. या युद्धाचा फटका संपूर्ण जगाला बसत आहे. अनेक देशांमध्ये महागाईत प्रचंड वाढ झाली आहे. ट्रम्प यांचा स्वभाव संपूर्ण जगाला माहित आहे. ते कधी एक गोष्ट बोलतात तर कधी दुसरी. काही दिवसांपूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी माझे खूप चांगले मित्र असल्याचे वक्तव्य केले होते. मात्र आता त्यांनी एक पोस्ट करुन पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी आपल्या सोशल मीडियावरील पोस्टमध्ये भारताविरोधात गरळ ओकणाऱ्या वक्तव्याला पाठिंबा दिला आहे. ट्रम्प यांनी ‘ट्रुथ सोशल’वर कट्टरपंथी अमेरिकन लेखक आणि समालोचक माइकल सॅवेज यांच्या एका जुन्या व्हिडिओतील मजकूर पोस्ट केला आहे.

माइकल सॅवेज यांनी १ एप्रिल रोजी त्यांच्या यूट्यूब चॅनेलवर ‘बर्थराइट सिटिझनशिप’ (जन्मसिद्ध नागरिकता) या विषयावर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. यामध्ये त्यांनी अमेरिकेच्या नागरिकत्व कायद्यावर टीका करताना भारतविरोधी विधाने केली होती. यामध्ये त्यांनी म्हंटले आहे, स्थलांतरित लोक चीन, भारत किंवा या पृथ्वीवरील इतर कोणत्याही ‘नरकसदृश’ ठिकाणांहून अमेरिकेत येतात; इथे मुले जन्माला घालतात, जी अमेरिकेचे नागरिक होतात, त्यानंतर ते चीन किंवा भारतातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला येथे बोलावून घेतात, असे म्हणत ट्रम्प यांनी ‘जन्मसिद्ध नागरिकत्व’ या मुद्द्यावर सुरू असलेल्या एका व्यापक चर्चेचा संदर्भ दिला.

- Advertisement -

तर अमेरिकेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल
अमेरिकेत जन्मसिद्ध नागरिकत्वाचा मुद्दा पुन्हा एकदा राजकीय आणि कायदेशीरदृष्ट्या चर्चेत आला आहे. सर्वोच्च न्यायालयात त्याच्या व्याप्तीवर सुनावणी सुरू आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी ही पोस्ट केली आहे. जन्मसिद्ध नागरिकत्वाबाबत येऊ घातलेल्या निकालाविषयी बोलताना ट्रम्प म्हणाले की, जर त्यांनी जन्मसिद्ध नागरिकत्वाच्या मुद्द्यावर आपल्या देशाच्या विरोधात निकाल दिला आणि तसे होण्याचीच शक्यता अधिक आहे, तर अमेरिकेला प्रचंड आर्थिक भुर्दंड सोसावा लागेल; परंतु, त्याहूनही महत्त्वाचे म्हणजे, अमेरिकेला आपली ‘प्रतिष्ठा’ गमवावी लागेल!

Election Commission Of India: काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंना निवडणुक आयोगाची नोटीस; नेमकं प्रकरण काय?

ट्रम्प यांचा भारतविरोधी वक्तव्याला पाठिंबा
विशेष म्हणजे, ज्या व्हिडिओला केवळ १२ हजार व्ह्यूज होते, त्यातील मजकूर ट्रम्प यांनी अक्षरश: ४ पानांमध्ये लिहून आपल्या प्लॅटफॉर्मवर शेअर केला आहे. राष्ट्राध्यक्ष पदावर असलेल्या व्यक्तीने अशा वांशिक आणि द्वेषपूर्ण विधानांना प्रसिद्धी दिल्याने, त्यांनी एकप्रकारे या विचारांवर आपली मोहोर उमटवली असल्याचे मानले जात आहे. सॅवेज यांनी आपल्या वक्तव्यात पुढे म्हटले की, सध्या अमेरिकेत येणाऱ्या स्थलांतरितांमध्ये देशाबद्दल कोणतीही निष्ठा उरलेली नाही आणि अनेक ठिकाणी आता इंग्रजीही बोलली जात नाही.

दरम्यान, या व्हिडिओमध्ये, विशेषतः भारतीय आणि भरती प्रक्रियेबाबतचे दावे, हे वादग्रस्त असून ते कोणत्याही सिद्ध पुराव्यांऐवजी केवळ राजकीय मतेच प्रतिबिंबित करतात, असे सांगितले जाते. भारतासोबतचे संबंध सुधारण्याचे दावे करणाऱ्या ट्रम्प यांच्या या दुटप्पी भूमिकेमुळे जागतिक स्तरावर, विशेषतः भारतीय समुदायामध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्या

माझ्या निधनानंतर पत्नीने कोणत्याही विधवा प्रथा पाळू नयेत; सौंदाळाचे सरपंच शरद...

0
नेवासा (तालुका प्रतिनिधी) नेवासा तालुक्यातील सौंदाळा ग्रामपंचायतीचे सरपंच शरद बाबुराव आरगडे यांनी समाजातील अनिष्ट रूढींविरोधात ठाम भूमिका घेत, स्वतःचे इच्छापत्र तयार केले आहे. त्यांनी केवळ...