Saturday, September 12, 2026
Homeक्राईमCrime News : हुंड्यासाठी तीन विवाहितांचा छळ

Crime News : हुंड्यासाठी तीन विवाहितांचा छळ

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

शहरात विवाहित महिलांच्या छळाच्या तीन वेगवेगळ्या घटना उघडकीस आल्या असून, तिन्ही प्रकरणांमध्ये पतीसह सासरच्या मंडळींविरूध्द पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत. कोतवाली पोलीस ठाण्यात दोन, तर तोफखाना पोलीस ठाण्यात एक गुन्हा दाखल झाला आहे. व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरहून 15 लाख रूपये आणण्याची मागणी करत विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केल्याची घटना उघडकीस आली आहे.

- Advertisement -

केडगावात राहणार्‍या पीडिताच्या फिर्यादीवरून पती निखील बाबासाहेब काळे, सासरे बाबासाहेब केरू काळे, सासू आशा बाबासाहेब काळे (सर्व रा. नवी सांगवी, पुणे) यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसर्‍या घटनेत कोठला परिसरात राहणार्‍या विवाहित महिलेला घर खरेदीसाठी माहेरून 15 लाख रूपये आणण्याची मागणी करत सासरच्या मंडळींकडून छळ करण्यात आला. पीडितेच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात सासु असमत सगीर सय्यद, सासरे सगीर जानमोहम्मद सय्यद, राहिल सगीर सय्यद, शबनम राहिल सय्यद, फय्याज अहमद शेख, नदीम अख्तर शेख, कहेकशा शेख व सोहिल सय्यद यांच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसर्‍या घटनेत सावेडी उपनगरात राहणार्‍या 36 वर्षीय डॉक्टर विवाहितेचा हुंड्यासाठी छळ करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पीडिताने दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती मनोज अशोक बारस्कर, सासरे अशोक माधव बारस्कर, सासु सीमा अशोक बारस्कर (तिघे रा. कॉटेज कॉर्नर, सावेडी), मावस सासरे विकास ऊर्फ बबलू गंगाधर जगताप, मावस सासू मीना विकास जगताप (दोघे रा. पाईपलाईन रस्ता, सावेडी) व नणंद पुजा प्रसाद पोकळे (रा. पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.

ताज्या बातम्या

नाशिकमध्ये शिक्षक संघटनांचा मोर्चा; प्रा. सोपान बोरसे यांच्या मृत्यूची चौकशी करा;...

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik महात्मा गांधी विद्यामंदिर, नाशिक संचलित समाजश्री प्रशांतदादा हिरे (म्युनिसिपल) माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मालेगाव येथील प्राध्यापक कै. सोपान खंडेराव बोरसे...