Thursday, October 1, 2026
HomeनगरRahata : राहात्याचा विकास करायला आम्ही समर्थ; विरोधकांनी स्वतःचा इलाज करावा

Rahata : राहात्याचा विकास करायला आम्ही समर्थ; विरोधकांनी स्वतःचा इलाज करावा

राहाता |वार्ताहर| Rahata

राहात्याच्या विकासाची काळजी करायला आम्ही समर्थ आहोत, विरोधकांनी स्वतःची काळजी करावी. काही लोकांना पाहिल्यावर ते मानसिक रुग्ण वाटतात, अशी टीका भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांनी केले. गुरुवारी शहरातील बाजारतळाच्या कामाची पाहणी केली. गेल्या काही दिवसांत विरोधकांनी या कामाच्या संथ गतीबाबत आणि नागरिकांना होणार्‍या त्रासाबाबत केलेल्या टीकेला त्यांनी सडेतोड उत्तर दिले. अहिल्यानगर जिल्हा आणि उत्तर महाराष्ट्रात पहिल्यांदाच एखाद्या नगरपंचायतीकडून अशा पद्धतीचे स्टॅम्प काँक्रीटचे काम केले जात आहे. हे साधे काँक्रीटीकरण नसून त्याला आकर्षक बनवण्यासाठी टॉप लेयरिंग करावे लागते. ज्यामुळे या कामाला थोडा वेळ लागला आहे.

- Advertisement -

उन्हाळ्यात हे काम केले असते तर कडक उन्हामुळे काँक्रीटला तडे गेले असते, म्हणून पावसाळ्यात हे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. पुढील 20 दिवसांत बाजारतळाच्या पाठीमागच्या बाजूचे काम पूर्ण होईल. ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वाढीव बाजारतळ विकसित करण्याची वर्क ऑर्डर मिळाली आहे. हे काम पुढील 3 महिने चालेल. हे आणि सध्याचे काम पूर्ण झाल्यानंतर वीरभद्र महाराजांच्या मंदिराच्या पुढील भागातही स्टॅम्प काँक्रीटचे काम हाती घेतले जाईल. कामाच्या गतीवरून प्रशासनावर आणि सत्ताधार्‍यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणार्‍या विरोधकांवर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या डॉक्टरकीच्या पेशाचा संदर्भ घेत खोचक टीका केली. ते म्हणाले, जनतेने मतदानाच्या माध्यमातून आम्हाला सत्ता दिली असून आम्ही तिचा योग्य वापर करत आहोत. काही लोकांना पाहिल्यानंतर ते मानसिक रुग्ण वाटतात.

एक डॉक्टर म्हणून मी त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला देतो. सध्या छान गार वारा सुटला आहे, त्यांनी कुठेतरी फिरायला जावे. आमचे नगराध्यक्षही डॉक्टर आहेत, ते इलाज करू शकतात; पण काही रुग्ण या डॉक्टरांच्याही पलीकडचे आहेत, त्यांना आम्ही आमच्या पद्धतीने हाताळू. येत्या काळात राहाता शहराचे एक बदललेले आणि प्रगत चित्र नागरिकांना पाहायला मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी नगराध्यक्ष डॉ. स्वाधिन गाडेकर, उपनगराध्यक्ष डॉ. विजय सदाफळ, गटनेते मुन्ना शहा, नगरसेवक राहुल सदाफळ, गोटू बोरकर, सुयोग शेळके, प्रदीप बनकर, योगेश डांगे, संदीप मुर्तडक, दशरथ तुपे, अजय आग्रे, वीरभद्र देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जबाजी मेचे, उपाध्यक्ष विजय सदाफळ, विश्वस्त सागर सदाफळ, निवृत्ती बनकर, प्रवीण सदाफळ, शुभम मुर्तडक व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : सिंहस्थाच्या तोंडावर झारखंड गँग नाशिकमध्ये; चोरी, दरोड्याचा...

0
​नाशिक | प्रतिनिधी | Nashik आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांनी (Nashik Police) शहरात सुरू केलेल्या हाय-अलर्ट व विशेष गस्त मोहिमेमुळे एक आंतरराज्यीय गुन्हेगारांटी टोळी...