Monday, October 12, 2026
HomeनगरAkole : तुम्ही एकदा आमचे ऐकले तर आम्ही दहावेळा तुमचे ऐकू -...

Akole : तुम्ही एकदा आमचे ऐकले तर आम्ही दहावेळा तुमचे ऐकू – डॉ. विखे पाटील

अकोले |प्रतिनिधी| Akole

जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजूर (ता. अकोले) येथील रविवारी (दि. 11) एका कार्यक्रमात भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील यांच्यासह अकोले तालुक्याचे आजी-माजी आमदार, सर्वपक्षीय नेतेमंडळी एकाच व्यासपीठावर आल्याचे चित्र पाहावयास मिळाले. डॉ. विखे पाटील व आमदार लहामटे यांनी एकमेकांच्या मैत्रीचे दाखले देत एकमेकांना कोपरखळ्याही मारल्या. तुम्ही आमचे एकदा ऐकले तर आम्ही तुमचे दहावेळा ऐकू असे म्हणताना डॉ. विखे पाटील यांनी आमदारांकडे कटाक्ष टाकला.

- Advertisement -

आमदार डॉ. लहामटे म्हणाले, की सुजयदादा तुम्हाला जेवढे पाणी न्यायचे तेवढे तुम्ही खाली नेलेलं आहे. आता आमच्या वाट्याचे पाणी आम्हाला राहू द्या. नाहीतर आम्हाला फक्त डोहाकडे पाहत बसण्याची वेळ येईल आणि सर्व पाणी खाली निघून जायचे असे काही दुष्काळी परिस्थिती असताना झाले नाही पाहिजे. मुळा, प्रवरा व आढळा असेल जेथे पाऊस पडतो तो पहिला हक्क त्यांचा आहे. तुम्ही तुमचे पाणी न्याल आणि आरक्षण लावणार, आम्हाला फक्त डोहाकडे पाहत बसावे लागेल. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत आरक्षण लावू नका अशी विनंती करण्यासही ते विसरले नाही. यानंतर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आपल्या भाषणास सुरुवात केली. जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एखादे नाव माझेकडून राहू नये म्हणून व्यासपीठावरील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनी असा उल्लेख करत अकोलेमध्ये येत असताना अतिशय संवेदनशील वातावरणाच्या वेळी मी आलेलो आहे.

जिल्हा बँक निवडणुकीत अकोले तालुक्याने वेगळे नाव कमावले आहे. निवडणुकीसाठी दाखल अर्जांपैकी 40 टक्के अर्ज अकोले तालुक्याचे आहेत. अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातून सात, भटक्या विमुक्त जाती-जमातीमधून आठ, महिला राखीव बिगर शेती व शेतीपूरक मतदारसंघातून 30 टक्के आणि सोसायटी मतदारसंघातून 11 अर्ज दाखल असल्याचे त्यांनी सांगितले.

हा तालुका किती जागृत असून, या तालुक्यात येणे किती धोकादायक आहे हे याच्यावरून सिद्ध होते. अकोले तालुक्यात येत असताना टप्प्याटप्प्याने थांबत थांबत सर्व ठराववाल्यांना भेटत आलो हे लोकांचे प्रेम आहे. तर आमदार लहामटे यांनी ‘आमच्या हक्काचे पाणी कोणी खाली घेऊन जातो’ हा आरोप आमच्यावर केला, तो खूप पूर्वीचा आहे अशी कोपरखळी मारली. या कार्यक्रमास तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : हंगामी, बागायती आणि बहुवार्षिक फळपिकांची माहिती संकलित होताच शेतकर्‍यांना...

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar पीक नुकसानीच्या भरपाईसाठी यापूर्वी लागू असलेल्या दुष्काळाच्या ट्रिगर दोन प्रक्रियेला फाटा देत राज्य शासनाने संपूर्ण राज्यात नुकसान झालेल्या खरीप हंगामातील कोरडवाहू आणि...