Monday, November 9, 2026
HomeनगरCrime News : दोन ट्रकसह साडेअकरा लाखांचे भंगार जप्त

Crime News : दोन ट्रकसह साडेअकरा लाखांचे भंगार जप्त

मालकी हक्काचे कागदपत्रे नसल्याने पोलिसांची कारवाई

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

अहिल्यानगर तालुका पोलिसांनी पहाटेच्या सुमारास केलेल्या कारवाईत भंगार साहित्याची वाहतूक करणारे दोन मालट्रक ताब्यात घेतले. या दोन्ही ट्रकमधील लोखंडी पत्रे व विविध प्रकारचे भंगार साहित्य, तसेच ट्रक असा एकूण 11 लाख 50 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम 124 अन्वये दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

- Advertisement -

तालुका पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक गणेश वारूळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदारांचे एक पथक शनिवारी (10 ऑक्टोबर) पहाटे हद्दीत गस्त घालत असताना ही कारवाई करण्यात आली. पहाटे 2.30 वाजण्याच्या सुमारास अमोल सुरेश शेजवळ (वय 28, रा. सावंगी गयळी, ता. चिखली, जि. बुलढाणा) हा त्याच्याकडील मालट्रकमधून भंगार साहित्य घेऊन जात होता. पोलिसांनी हा ट्रक थांबवून त्याच्याकडे साहित्याच्या मालकी हक्काबाबत चौकशी केली. मात्र, त्याला भंगार साहित्याबाबत मालकी हक्काची कागदपत्रे किंवा अन्य पुरावा सादर करता आला नाही. या कारवाईत पोलिसांनी एमएच 18 बीए 0635 क्रमांकाचा चार लाख रूपये किमतीचा मालट्रक आणि त्यातील दोन लाख रूपये किमतीचे लोखंडी पत्रे व विविध प्रकारचे भंगार साहित्य, असा एकूण सहा लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त केला.

दुसर्‍या कारवाईत पहाटे 2.45 वाजण्याच्या सुमारास खंडु लक्ष्मण सुरवसे (वय 33, रा. फुरसुंगी, ता. हवेली, जि. पुणे) हा मालट्रकमधून भंगार साहित्याची वाहतूक करताना आढळला. पोलिसांनी त्याचा एमएच 45 टी 9496 क्रमांकाचा ट्रक थांबवून चौकशी केली. या वेळी त्यालाही भंगार साहित्याच्या मालकी हक्काबाबत आवश्यक कागदपत्रे किंवा पुरावा सादर करता आला नाही. या कारवाईत चार लाख रूपये किमतीचा मालट्रक आणि त्यातील एक लाख 50 हजार रूपये किमतीचे भंगार साहित्य, असा एकूण साडेपाच लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

ताज्या बातम्या

Rahata : कोल्हारमध्ये भर बाजारपेठेत गोडाऊनला आग

0
कोल्हार |वार्ताहर| Kolhar एकीकडे दीपावलीच्या सणाच्या धामधुमीत सर्वजण असताना कोल्हार बुद्रुक येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराजवळ भर मार्केटमध्ये मध्यवर्ती ठिकाणी सोमवारी रात्री सात वाजेच्या सुमारास अचानक एका...