Saturday, April 11, 2026
Homeदेश विदेशIran Israel War Impact : भारतात ड्रायफ्रूट्स महाग होणार ?

Iran Israel War Impact : भारतात ड्रायफ्रूट्स महाग होणार ?

इराण-इस्रायलच्या युद्धाचा फटका

नवी दिल्ली | New Delhi

इराण, इस्रायल आणि अमेरिका यांच्यातील युद्ध संघर्ष (Iran Israel America War) दिवसेंदिवस विकोपाला जाताना दिसत आहेत. याचा देशांमधील वाढत्या तणावामुळे जागतिक पातळीवरील व्यापार साखळी विस्कळीत झाली आहे. याचा थेट परिणाम भारताच्या सुकामेवाच्या (Dried Fruit) आयातीवर झाला आहे.

- Advertisement -

भारतात (India) सुक्या मेव्याच्या (Dried Fruit) किमतीत मोठी वाढ झाली आहे. पिस्ता (Pistachio) आणि अंजीराचे (Fig) दर किलोमागे 100 रुपयांपर्यंत वधारले असून, सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांचे बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. इराणमधील (Iran) अनेक प्रमुख बंदरे बंद झाल्यामुळे आणि अफगाणिस्तानमधील (Afghanistan) वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे पिस्ता, अंजीर आणि मनुका (Raisin) यांसारख्या पदार्थांच्या किंमतीत मोठी वाढ झाली आहे.

बाजारातील तज्ज्ञांच्या मते, युद्धामुळे पुरवठा साखळी खंडित झाली आहे. त्यामुळे विविध सुक्या मेव्याच्या किंमतीत प्रति किलो 40 रुपयांपासून 100 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. सध्या पिस्त्याच्या किमतीत मोठी वाढ झाल्याचे दिसत आहे. साधारण 1200 ते 1300 रुपये प्रति किलो मिळणारा पिस्ता (Pistachio) आता 1500 ते 1600 रुपये प्रतिकिलो इतका झाला आहे. इराण आणि अमेरिकेतील कॅलिफोर्निया (California) या ठिकाणाहून पिस्त्याची आयात होते. मात्र ही आयात घटल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे.

त्याचप्रमाणे, अंजीर आणि मनुका यांच्या दरावरही मोठा परिणाम झाला आहे. भारताला होणारा बहुतांश अंजीराचा पुरवठा अफगाणिस्तानमधून होतो, मात्र तिथल्या अंतर्गत समस्या आणि आखाती संकटामुळे वाहतुकीचे रस्ते बंद झाले आहेत. यामुळे अंजीराचे दर किलोमागे 100 रुपयांनी ने वाढले आहेत. दुसरीकडे, देशांतर्गत मनुका साठा संपत आला आहे. त्यामुळे मनुक्याचे दरही वाढले आहेत.

सुक्या मेव्याच्या इतर प्रकारांच्या किमती वाढत असताना अक्रोडाचे दर मात्र सध्या स्थिर आहेत. याचे मुख्य कारण म्हणजे सध्या काश्मीरमधून घरगुती अक्रोडाची आवक मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. स्थानिक उत्पादन पुरेसे असल्याने परकीय तणावाचा परिणाम अक्रोडावर किमान पुढील दोन महिने तरी होण्याची शक्यता कमी आहे.

भारत ड्रायफ्रूटसाठी मोठ्या प्रमाणावर इराणवर अवलंबून आहे. विशेषतः बंदर अब्बास आणि चाबहार ही दोन इराणी बंदरे भारतासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत. सध्याच्या तणावामुळे ही बंदरे अंशतः बंद आहेत. त्यामुळे तिथून होणारी जहाजांची ये-जा थांबली आहे. यामुळे समुद्रात अनेक मालवाहू जहाजे अडकून पडली आहेत. इराणमधून (Iran) होणारा पुरवठा थांबला आहे. तर दुसरीकडे भारतीय व्यापार्‍यांकडे साठवलेला माल दिवसेंदिवस कमी होत आहे. त्यामुळे किंमती सातत्याने वाढत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Accident News : दुर्दैवी घटना! जागरण गोंधळाचा कार्यक्रम आटोपून परतताना...

0
पंचाळे | वार्ताहर | Pnachale सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) पंचाळे गावाजवळ (Panchale Village) आज (शनिवारी) मध्यरात्री एकच्या सुमारास आयशर ट्रक आणि पिकअपच्या (Eicher trucks and...