Friday, October 30, 2026
HomeनगरAhilyanagar : दुष्काळाचा अडसर की जानेवारीत धडाका?

Ahilyanagar : दुष्काळाचा अडसर की जानेवारीत धडाका?

स्थानिक स्वराज्यबाबत निवडणूक आयोगाच्या भूमिकेकडे लक्ष

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, जिल्ह्यात असणारी दुष्काळी स्थिती यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार की पुढे ढकलल्या जाणार याबाबत संभ्रमावस्था आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार निवडणुका घेण्याची वेळ आल्यास जानेवारीमध्ये जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचा बार उडण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

दरम्यान, निवडणूक विभागातील सूत्रांच्या माहितीनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची प्रत मिळाल्यानंतर साधारण 15 दिवस ते महिनाभर या कालावधीत निवडणूक आयोग अभ्यास करून जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुका घेण्याबाबत घोषणा करू शकते. याबाबतचा अंतिम निर्णय निवडणूक आयोगाच्या अख्यात्यारित येत असल्याने त्यावर आता लगेच भाष्य करता येणे शक्य नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

2022 मध्ये ओबीसी आरक्षणाचे कारण पुढे करत राज्य निवडणूक आयोगाने नगरसह राज्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका थांबवण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाविरुद्ध गेल्या पाच वर्षापासून सर्वोच्च न्यायालयात तारीख पे तारीख सुरू होती. त्यावर आता अंतरिम निकाल झाला असून न्यायालयाने ओबीसी आरक्षणाच्या सुनावणीला अधिक होऊन नगरसह राज्यातील निवडणुका रखडलेल्या 12 जिल्हा परिषद व 221 पंचायत समित्या या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत.

नगर जिल्ह्यात 2022 पासून आतापर्यंत पाच वर्षाच्या कालावधी लोटला असून या कालावधीत जवळपास सदस्यांची एक टर्म संपूष्टात आलेली आहे. दुसरीकडे जिल्ह्यात सध्या दुष्काळाची सुरूवात असून डिसेंबरनंतर त्यात मोठी वाढ होणार आहे. यामुळे जिल्हा परिषद किंवा पंचायत समित्याच्या निवडणूका होणार की पुढे ढकल्या जाणार याबाबत सध्या स्पष्टता नाही. राज्य निवडणूक आयोगाने भूमिका स्पष्ट केल्यावरच जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या निवडणूका दृष्टीपथात येणार आहेत.

एसआयआर प्रोग्राममुळे नव्याने मतदार यादी
नगरसह राज्यात सुरू असणार्‍या मतदार यादी विशेष पुनर्परीक्षण कार्यक्रम (एसआयआर) यामुळे नगर जिल्ह्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी नव्याने मतदार यादी तयार करावी लागणार आहे. जिल्ह्यातील एसआयआर प्रोग्राम हा 12 नोव्हेंबर रोजी संपणार असून हा प्रोग्राम संपल्यानंतर जिल्ह्यातील पात्र मतदारांसह पात्र मतदारांची संख्या निश्चित होणार आहे. एसआय आरप्रोग्रा ममध्ये निश्चित होणारी मतदार यादी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी वापरण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक विभागाच्या वतीने देण्यात आली.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : नोव्हेंबर 2025 मध्ये थंडावल्या होत्या निवडणूका

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar नगर जिल्ह्यात नोव्हेंबर 2025 पर्यंत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी सुरू होती. आधी गट आणि गणाची प्रभाग रचना, त्यानंतर आरक्षण...