Friday, September 25, 2026
HomeनगरAhilyanagar : राज्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी 11 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर

Ahilyanagar : राज्यातील कोरडवाहू शेतकर्‍यांसाठी 11 कोटी 81 लाखांचा निधी मंजूर

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

राज्य सरकारने राष्ट्रीय कृषी विकास योजनेंतर्गत कोरडवाहू क्षेत्र विकास योजनेसाठी 2025-26 या आर्थिक वर्षातील दुसर्‍या हप्त्याचा निधी वितरीत करण्यास काल सोमवारी मान्यता दिली. केंद्र आणि राज्याचा मिळून उर्वरित 11 कोटी 81 लाख 66 हजार रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

- Advertisement -

सन 2025-26 मध्ये राष्ट्रीय कृषी विकास योजनेंंतर्गत कोरडवाहु क्षेत्र विकास योजनेसाठी तिन्ही प्रवर्गासाठी प्राप्त झालेला केंद्र हिस्सा सात कोटी नऊ लाख रूपये त्यास अनुरुप राज्य हिस्सा चार कोटी बहात्तर लाख सहासष्ट हजार सहाशे सदुसष्ट रूपये असा एकूण 11 कोटी 81 लाख 66 हजार रुपये इतका निधी आयुक्त (कृषि) यांना अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीद्वारे केंद्र व राज्य हिश्श्याचे प्रवर्गनिहाय (सर्वसाधारण, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती) निधी वितरीत करण्यात येत आहे. या निर्णयामुळे कोरडवाहू शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे गणित गुंतागुंतीचे

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळातील 21 जागांसाठी निवडणूक होणार असल्याने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय गणिते पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत. दरम्यान,...