Tuesday, June 16, 2026
Homeदेश विदेशभयंकर! 'दुबई एअर शो'त मोठा अपघात; 'तेजस'नं टेक ऑफ घेताच काही क्षणात...

भयंकर! ‘दुबई एअर शो’त मोठा अपघात; ‘तेजस’नं टेक ऑफ घेताच काही क्षणात जमिनीवर कोसळलं

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानाचा भंयकर अपघात झाला. दुबईमध्ये सुरू असलेल्या एअर शो दरम्यान हा अपघात घडला. हवाई कसरती सादर करण्यासाठी तेजस हवेत झेपावले होते. मात्र, काही क्षणातच ते खाली कोसळले. पायलट बाहेर पडला की नाही हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. व्हिडिओमध्ये दाखवले आहे की आकाशात असताना, तेजस विमान अचानक जमिनीवर आदळले, त्यानंतर मोठा स्फोट झाला.

दुबईतील एअर शोमध्ये भारतीय हवाई दलाचे तेजस हे लढाऊ विमानही सहभागी झाले होते. चित्तथरारक प्रात्यक्षिक करून दाखवण्यासाठी ते आकाशात झेपावले होते. पण, कसरती करण्यापूर्वीच अल मक्तूम आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या एअरफील्डच्या दूरच्या बाजूला खाली कोसळले. ही घटना शुक्रवारी दुपारी २ वाजून १० मिनिटांनी घडली.

- Advertisement -

विमान कोसळल्यानंतर घटनास्थळावरून काळ्या धुराचे मोठे लोट आकाशात उठताना दिसले. ज्यामुळे एअर शो पाहण्यासाठी जमलेल्या लोकांमध्ये, विशेषतः लहान मुलांसह आलेल्या कुटुंबांमध्ये, भीतीचे वातावरण निर्माण झाले.

भारतीय हवाई दलाने तेजस विमान कोसळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. या घटनेची माहिती मिळवत आहोत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

दुबई एअर शो हा जगातील महत्त्वाचा एव्हिएशन आणि डिफेन्स शो समजला जातो. येथे जगभरातील सुप्रसिद्ध एयरोस्पेस कंपन्या, एअरलाईन्स, विविध देशांच्या वायुसेना आणि डिफेन्स टेक्नॉलॉजी कंपन्या आपले नवीन विमान, हेलिकॉप्टर आणि एव्हिएशन तंत्रज्ञानाचा शो करतात.

भारताच्या स्वदेशी बनावटीचे तेजस लढाऊ विमान आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची संरक्षण क्षमता दर्शविण्यासाठी दुबई एअर शोमध्ये सहभागी झाले होते. यापूर्वीहीतेजसच्या कामगिरीबद्दल सोशल मीडियावर काही अफवा पसरल्या होत्या, ज्या भारतीय सरकारने तांत्रिक माहिती देऊन खोट्या ठरवल्या होत्या. मात्र आता ही दुर्घटना घडल्यामुळे या विमानाची आंतरराष्ट्रीय स्तरावरची प्रतिमा आणि विश्वासार्हता पुन्हा एकदा चर्चेत येण्याची शक्यता आहे.

देशदूत व्हॉट्सॲप ग्रुपला जॉइन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Sanchita Ugale : चित्रपटसृष्टीत मानसिक छळ? संचिता उगले मृत्यू प्रकरणात धक्कादायक...

0
मुंबई । Mumbai 'कुमकुम भाग्य', 'वागले की दुनिया' यांसारख्या लोकप्रिय मालिका आणि अभिनेता विक्की कौशलसोबत स्क्रीन शेअर करणारी अत्यंत प्रतिभावान व तरुण अभिनेत्री संचिता उगले...