Saturday, November 28, 2026
Homeब्रेकिंग न्यूजAmol Kolhe: सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी का मारली? खासदार कोल्हेंनी...

Amol Kolhe: सुप्रिया सुळेंनी इंडिया आघाडीच्या बैठकीला दांडी का मारली? खासदार कोल्हेंनी दिली माहिती, म्हणाले, काँग्रेसच्या नेत्यांकडून…

पुणे | Pune
मतदारसंघ पुनर्रचना अर्थात डिलिमिटेशन विधेयकाच्या पार्श्वभूमीवर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या विरोधी पक्षाच्या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार गैरहजर राहणार असल्याच्या वृत्तानंतर काँग्रेस आणि शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली. शरद पवार यांचा झंजीर खुपसण्याचा इतिहास राहिलाय, अशी टीका काँग्रेस पक्षाने केली. तर राष्ट्रवादीला आता फुले शाहू आंबेडकरांचे नाव घेण्याचा अधिकार नाही, पवारांना महाराष्ट्र माफ करणार नाही, अशी संतप्त प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली. त्यावर शरद पवार गटाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया दिली असून काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे.

संजय राऊतांनी आणि विजय वडेट्टीवार यांनी संतापून प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, त्यावरती बोलताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमोल कोल्हे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मला असं वाटतंय, खूप घाईने प्रतिक्रिया दिली जातेय. काल त्यांच्या पक्षाचे खासदार अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया बघितली. संजय राऊत खूप मोठे नेते आहेत, ते अनेक लोकांना निवडून आणतात. पण ज्यांना लोकांमधून निवडून यावे लागते, त्यांच्याच खासदाराने प्रतिक्रिया दिली, बिलाचा अभ्यास होऊ द्या, मग त्यावर बोलणे योग्य ठरेल. आमचा निर्णय अजून झालेला नाही, सोमवारी आम्ही राष्ट्रवादीचे ८ खासदार एकत्र बसू यावर चर्चा करुन निर्णय घेऊ.

- Advertisement -

पवारांची एवढी काय मजबुरी? मोदी-शाहांचे हात बळकट करणे हा महाराष्ट्रद्रोह; डिलिमीटेशनच्या पाठिंब्यावरुन संजय राऊतांचा निशाणा

”इंडिया आघाडीच्या बैठकीला सुप्रियाताई व्हिडीओ कॉलद्वारे उपस्थित राहणार होत्या. परंतु काँग्रेसच्या नेत्यांकडून अशा पद्धतीने विधानं होतं असतील तर आम्ही ताईंना, बैठकीला उपस्थित राहण्याची गरज नाही, असं सांगितलं आहे. काल बिलाचा ड्राफ्ट आलेला आहे. त्यावर आमचे सर्व खासदार अभ्यास करतील आणि मतभेद असतील तर चर्चिली जातील. त्यानंतर निर्णय होईल.” असं खासदार कोल्हे म्हणाले.

अमोल कोल्हे पुढे बोललो की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संसदेत विधेयकावरील चर्चेत सहभाग घेणार आहे. पक्षाची भूमिका संसदेच्या पटलावर आम्ही ठेऊ. त्याआधीच समर्थन, विरोध अशा अटकळी बांधणं चुकीचं आहे. हे विधेयक संविधानविरोधी कसं आहे, काँग्रेसने ते समजून सांगितलं तर आम्हालाही कळेल. सरसरकट विरोधात प्रचार करण्यापेक्षा नेमका विरोध का आहे, हे त्यांनी सांगणं आवश्यक आहे. आमच्या निर्णयापूर्वीच काँग्रेसने बोलणं चुकीचं आहे.

ताज्या बातम्या

रोहित

Rohit Pawar: तेंव्हा नातं बाजूला ठेवून मी विचाराच्या बाजूने लढलो, आजही...

0
मुंबई | Mumbaiराष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाच्या डिलिमिटेशन विधेयकावरील भूमिकेमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पवारांच्या या भूमिकेमुळे इंडिया आघाडीत फूट पडल्याचे बोलले...