Thursday, May 2, 2024
Homeदेश विदेशलालू प्रसाद यादव यांना ईडीचा दणका ; 'या' प्रकरणात कुटुंबीयांची कोट्यावधींची मालमत्ता...

लालू प्रसाद यादव यांना ईडीचा दणका ; ‘या’ प्रकरणात कुटुंबीयांची कोट्यावधींची मालमत्ता जप्त

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi

जमिनीच्या मोबदल्यात नोकरी प्रकरणात लालूप्रसाद यादव (LaluPrasad Yadav) यांच्या कुटुंबीयांच्या अडचणी वाढल्या आहेत. बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दल पक्षाचे (JanataDal Party) सर्वेसर्वा लालूप्रसाद यादव यांना अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठा दणका दिला आहे. ‘लँड फॉर जॉब’ (Land For Job) प्रकरणात लालूंचे हात काळे असल्याचे उघड झाले असून त्यांची आणि कुटुंबीयांची ६ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

- Advertisement -

या प्रकरणात लालू प्रसाद, राबडी देवी, तेजस्वी, मीसा, हेमा यांच्यासह आरोपींची यापूर्वीच चौकशी करण्यात आली आहे. यापूर्वी दिल्लीच्या राऊज अव्हेन्यू कोर्टात आयआरसीटीसी प्रकरणी सुनावणी झाली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी ७ ऑगस्ट रोजी होणार आहे.

ज्ञानवापीवरुन योगी आदित्यनाथ आक्रमक ; म्हणाले, …

रेल्वेत नोकरीच्या मोबदल्यात लाचेने जमीन घेतल्याच्या आरोपांची सीबीआय चौकशी करत आहे. दरम्यान, मनी लाँड्रिंग प्रकरणाचा तपास ईडी करत आहे. या प्रकरणी सीबीआयने आरोपपत्रही दाखल केले आहे. लालू यादव यांचे निकटवर्तीय आणि माजी आमदार भोला यादव आणि हृदयानंद चौधरी हेदेखील या प्रकरणात आरोपी आहेत.

दरम्यान, लालू प्रसाद यांच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप फेटाळले असून हे राजकीय षडयंत्र असल्याचे म्हटले आहे. ‘जमिनीच्या बदल्यात नोकरी’चे प्रकरण पुन्हा एकदा समोर आले आहे. सीबीआयने यापूर्वी दोनदा या प्रकरणाचा तपास केला असून त्यांना कोणतेही पुरावे मिळाले नाहीत. यानंतर सीबीआयने हे प्रकरण बंद केले होते. मग आता सीबीआय या प्रकरणाची चौकशी करून काय जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप कुटुंबीयांनी लगावला.

Governor Appointed MLC : १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले ‘हे’ आदेश

बिहारमधील हा घोटाळा १४ वर्षांपूर्वीचा आहे. केंद्रात यूपीएचे सरकार होते आणि लालू यादव रेल्वेमंत्री होते. या प्रकरणी सीबीआयने १८ मे २०२२ रोजी गुन्हा दाखल केला होता. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, रेल्वेमध्ये ग्रुप डी पदांसाठी आधी पर्यायी लोकांची भरती करण्यात आली होती. जेव्हा जमीन व्यवहार झाला, तेव्हा त्यांना नियमित करण्यात आले.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…

- Advertisment -

ताज्या बातम्या