Monday, October 14, 2024
Homeनगरईदची सरकारी सुट्टी सोमवारीच

ईदची सरकारी सुट्टी सोमवारीच

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

मुस्लिम बांधवांच्या ईद-ए-मिलाद सणानिमित्त नगर जिल्ह्यातील सार्वजनिक सरकारी सुट्टी सोमवार, 16 सप्टेंबर 24 रोजीच राहील, असे जिल्हा प्रशासनाने स्पष्ट केले आहे. मंगळवार, 17 रोजी गणेश विसर्जन आहे. सामाजिक सलोख कायम राहावा, यासाठी मुंबईत ईदची सुट्टी 18 रोजी जाहीर करण्यात आली.

- Advertisement -

मात्र राज्यात संबंधित जिल्हाधिकार्‍यांनी स्थानिक स्थितीनुसार निर्णय घेण्याची सरकारची सुचना होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या अहवालाअंती नगर जिल्हाधिकार्‍यांनी ईदची सार्वजनिक सुट्टी 16 सप्टेंबर रोजी कायम ठेवण्याचा आदेश शनिवारी उशिरा सायंकाळी जाहीर केला.

- Advertisment -

ताज्या बातम्या