Monday, July 27, 2026
Homeब्रेकिंग न्यूजEknath Shide: अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश; म्हणाले, सर्व...

Eknath Shide: अमित शाहांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंचे पदाधिकाऱ्यांना महत्वाचे आदेश; म्हणाले, सर्व संभाव्य प्रवेश…

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
महायुती सरकारमध्ये असलेल्या शिवसेना-भाजपामध्ये एकमेकांच्या पक्षातील नेते, पदाधिकारी यांना प्रवेश दिला जात असल्याने निर्माण झालेला वाद बुधवारी दिल्लीच्या दरबारी पोहोचला. बुधवारी शिवसेना शिंदे गट प्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल अचानक दिल्ली गाठत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांची भेट घेतली. या भेटीत एकनाथ शिंदे यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची तक्रार अमित शाहांकडे केली असल्याचे समजते. महायुतीतील शिंदेसेना आणि भाजपा यांच्यात प्रामुख्याने एकमेकांच्या नेत्यांना पक्षात घेण्यावरून वाद सुरू आहे. त्यात कल्याण डोंबिवलीतील पक्षांतरामुळे शिंदे नाराज झाले. आता अमित शाह यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी राज्यातील शिंदेसेनेच्या नेत्यांना महत्त्वाचा आदेश दिल्याचे समोर आले आहे.

भाजपने शिंदेसेनेच्या काही पदाधिकाऱ्यांचा पक्ष प्रवेश करवुन घेतल्याने नाराज झालेल्या शिवसेनेने पक्षातील काही असंतुष्ट पदाधिकाऱ्यांना गळाला लावण्याची रणनीती आखली होती. २२ नोव्हेंबरला मित्र पक्षातील या पदाधिकाऱ्यांचा प्रवेश सोहळा होणार होता. परंतु, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आाणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गेल्या दोन दिवसांत झालेल्या चर्चेनंतर हे सर्व संभाव्य प्रवेश रोखण्याचे आदेश आता एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. महायुतीत वितुष्ट येईल असे कोणतेही काम करू नका असे शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना आदेश दिले आहे. हे पक्षप्रवेश प्रामुख्याने ठाणे, रत्नागिरी, मराठवाडा, नवी मुंबई, रायगड या भागातले होते.

- Advertisement -

यावेळी, महायुतीमधील वादावर मंत्री उदय सामंत म्हणाले की, महायुतीत नाराजी नाही, आमच्यात संवाद होत असतो. यापुढच्या काळात शिवसेनेचा धनुष्यबाणाचा जो पदाधिकारी असेल त्याला भाजपात घ्यायचे नाही आणि भाजपाचा पदाधिकारी शिवसेनेत घ्यायचा नाही असे स्पष्ट आदेश आम्हाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. ही कार्यवाही आमच्या पक्षात सुरू झाली आहे. कालच आम्हाला एकनाथ शिंदे यांनी सांगितले आहे, जिल्हाप्रमुख आणि उपनेत्यांना या गोष्टी कळवा, तसा एकनाथ शिंदे यांचा आदेश आम्ही शेवटच्या पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहचवला आहे असे त्यांनी सांगितले.

अमित शाहांचे महाराष्ट्रातील घडामोडींवर लक्ष
अमित शाह यांनी या चर्चेरदरम्यान एकनाथ शिंदेंना महाराष्ट्रातील ब-याच गोष्टीवर माझे लक्ष आहे असे सांगितले. तसेच तुम्ही एऩडीएचे प्रमुख पक्ष आहात. तुमचा सन्मान राखला जाईल असे आश्वासनही दिले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Bhandardara : निळवंडेतूनही विसर्ग वाढविला; लाभक्षेत्रात समाधान

0
अकोले | Akole उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीने भंडारदरा खालोखाल महत्वपूर्ण असणारे निळवंडे धरणही शुक्रवारी भरले. पाण्याची आवक वाढतच असल्याने अखेर निळवंडे धरणातील पाणीसाठा नियंत्रणासाठी काल...