नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना शिंदे गटाचे मुख्य नेते एकनाथ शिंदे हे सोमवारी रात्री दिल्ली दौऱ्यावर दाखल झाले होते. काल रात्री अचानकपणे एकनाथ शिंदे हे दिल्ली दौऱ्यावर आल्यानं चर्चांना उधाण आले होते. आज, सकाळी एकनाथ शिंदे यांनी आज पंतप्रधान मोदींची भेट घेऊन चर्चा केली. दोघांमध्ये जवळपास दोन तास चर्चा चालली. नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले.
मोदींसोबतच्या बैठकीत काय चर्चा झाली?
पंतप्रधान मोदी यांच्यासोबत बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, आजच्या बैठकीत राज्यातील विकास कामांच्या मुद्यावर चर्चा झाली असल्याचे त्यांनी सांगितले. एकनाथ शिंदे यांनी पुढे म्हटले की, युद्ध काळात सगळ्यांनी एकत्र येऊन एकजुटीने पंतप्रधानांसोबत उभे राहणे आवश्यक आहे. विरोधकांकडून राजकारण सुरू आहे. हा प्रकार निंदनीय आहे. पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नाने युद्धजन्य स्थितीमध्ये परदेशात अडकलेल्या भारतीयांना मायदेशी आणण्यात यश मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.
महागाईचा भडका! १ एप्रिलपासून ‘या’ वस्तू होणार महाग, खिशाला बसणार मोठा कात्री
ठाकरेंना मदत करणार का?
शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना विधान परिषदेचे आमदार व्हायचे असेल तर एकनाथ शिंदेंना फोन करा…एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत, असं विधान केले होते. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांना नरेश म्हस्केंच्या याच विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?, असा प्रश्न विचारताच राज्यसभेची निवडणूक झाली. आता विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू, असे एकनाथ शिंदेंनी हसतहसत उत्तर दिले.





