Thursday, May 14, 2026
Homeदेश विदेशमहागाईचा भडका! १ एप्रिलपासून 'या' वस्तू होणार महाग, खिशाला बसणार मोठा कात्री

महागाईचा भडका! १ एप्रिलपासून ‘या’ वस्तू होणार महाग, खिशाला बसणार मोठा कात्री

दिल्ली । Delhi

नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात सर्वसामान्यांसाठी आर्थिक आव्हाने घेऊन येणारी ठरणार आहे. १ एप्रिलपासून दैनंदिन वापरातील अनेक वस्तूंच्या किमतीत मोठी वाढ होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. जागतिक स्तरावर कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि मालवाहतुकीच्या दरातील वाढीमुळे विविध कंपन्यांनी आपल्या उत्पादनांचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. परिणामी, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील वस्तू एप्रिल महिन्यापासून ५ ते १० टक्क्यांनी महागण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

या दरवाढीमागे प्रामुख्याने कच्च्या मालाची टंचाई आणि वाढलेला उत्पादन खर्च ही मुख्य कारणे आहेत. उत्पादन प्रक्रियेत महत्त्वाचे असलेल्या प्लास्टिक, रेझिन आणि पॉलिमर यांसारख्या कच्च्या मालाच्या किमतीत अचानक मोठी वाढ झाली आहे. कच्चा माल महागल्यामुळे कंपन्यांचा उत्पादन खर्च वाढला असून, हा वाढीव खर्चाचा भार आता थेट ग्राहकांच्या खिशावर टाकला जाणार आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील घडामोडींचाही या दरवाढीवर मोठा परिणाम झाला आहे. जागतिक स्तरावर मालवाहतुकीचे (Freight) दर ७ ते १० टक्क्यांनी वधारले आहेत. तसेच, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपयाचे मूल्य सुमारे २ टक्क्यांनी घसरल्याने परदेशातून आयात होणारा कच्चा माल आणि सुटे भाग अधिक महाग झाले आहेत. यामुळे आयात शुल्काचा अतिरिक्त बोजा कंपन्यांवर पडत आहे.

वाहन खरेदीचे स्वप्न पाहणाऱ्या ग्राहकांसाठी ही बातमी चिंताजनक आहे. लक्झरी कार उत्पादक कंपन्या मर्सिडीज-बेंझ (Mercedes-Benz) आणि ऑडी (Audi) यांनी १ एप्रिलपासून आपल्या कारच्या किमतीत २ टक्क्यांनी वाढ करण्याची अधिकृत घोषणा केली आहे. यासोबतच इतर सामान्य कार उत्पादक कंपन्या देखील आपल्या वाहनांच्या दरात २ ते ३ टक्क्यांनी वाढ करण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळे नवीन कार घेणाऱ्यांना आता आपले बजेट वाढवावे लागणार आहे. केवळ वाहनेच नव्हे, तर घरातील दैनंदिन गरजेच्या इलेक्ट्रॉनिक वस्तूही महागणार आहेत. उन्हाळ्याच्या तोंडावर टीव्ही, फ्रीज आणि एअर कंडिशनर (AC) यांच्या किमतीत ५ ते ६ टक्क्यांची वाढ होणार आहे. प्लास्टिक आणि पॉलिमरचा वापर मोठ्या प्रमाणात होणाऱ्या वस्तूंवर याचा सर्वाधिक परिणाम दिसून येईल.

याव्यतिरिक्त, जीवनशैलीशी संबंधित वस्तूंवरही महागाईचा प्रभाव पडणार आहे. शूज आणि सिंथेटिक फायबरपासून बनवलेले कपडे ९ ते १० टक्क्यांनी महाग होऊ शकतात. घराला रंगरंगोटी करण्यासाठी वापरले जाणारे डेकोरेटिव्ह पेंटदेखील महागणार असल्याने सर्वसामान्यांचे गृहखर्च वाढणार आहेत. एकूणच, नवीन आर्थिक वर्षात महागाईचा हा भडका सर्वसामान्यांचे आर्थिक नियोजन कोलमडवून टाकणारा ठरू शकतो.

ताज्या बातम्या

Nashik Crime News : एटीएसची झाडाझडती! राज्यात नाशिकसह चाळीस ठिकाणी छापे;...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik पाकिस्तानातील (Pakistan) लाहोरचा (Lahor) कुख्यात गँगस्टर शहजाद भट्टी याच्या सिंडिकेटशी संबंधित संशयास्पद संपर्कांवर महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी पहाटेपासून राज्यासह नाशिक...