Monday, June 22, 2026
Homeब्रेकिंग न्यूजECI New: निवडणुक आयोगाची मोठी कारवाई! ४७४ राजकीय पक्षांवर कारवाई; नोंदणीच केली...

ECI New: निवडणुक आयोगाची मोठी कारवाई! ४७४ राजकीय पक्षांवर कारवाई; नोंदणीच केली रद्द, महाराष्ट्रातील ‘इतक्या’ पक्षांचा समावेश

नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
निवडणूक आयोगाने देशातील बिगर मान्यप्राप्त राजकीय पक्षांवर मोठी कारवाई केली आहे. निवडणूक आयोगाकडून ४७४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाने याआधी ऑगस्ट महिन्यात मोठी कारवाई केली होती. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश आहे. त्याचबरोबर आणखी ३५९ पक्षांविरूद्धही यादीतून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे या पक्षांना मोठा धक्का बसला आहे.

निवडणुक आयोगाने एकूण ३३४ पक्षांची नोंदणी रद्द केली होती. लोकप्रतिनिधी कायदा 1951 नुसार, नोंदणीकृत राजकीय पक्ष निवडणुकीत सहभाग नोंदवू शकतो. सलग ६ वर्ष निवडणुकीपासून दूर राहणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी रद्द होते. या नियमाअंतर्गत निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. आयोगाने आतापर्यंत ८०८ पक्षांची नोंदणी रद्द केली आहे. यात महाराष्ट्रातील ४४ पक्षांचा समावेश आहे. मात्र या पक्षांची यादी अद्याप समोर आलेली नाही.

- Advertisement -

पहिल्या टप्प्यात ९ ऑगस्ट २०२५ रोजी ३३४ नोंदणीकृत अमान्यताप्राप्त पक्षांना यादीतून काढून आले होते, त्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यात १८ सप्टेंबर रोजी आणि ४७४ पक्षांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता या पक्षांना निवडणूक लढवताना अडचणींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

आयोगाकडून कारवाई करण्यात आलेले राजकीय पक्ष हे २३ राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातील आहे. उत्तर प्रदेशातील १२१ राजकीय पक्ष होते. तर बिहार १५, हरियाणा १७, मध्य प्रदेशमधील २३ राजकीय पक्षांचा समावेश आहे. तर महाराष्ट्रातील ४४ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. तर पंजाबच्या २१ राजकीय पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Crime News : अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची...

0
ओझे l वार्ताहर | Oze नाशिक शहरात (Nashik City) अन्न व औषध प्रशासन विभागाचे अधिकारी असल्याची खोटी बतावणी करून बेकरी व्यावसायिकांकडून पैसे उकळणाऱ्या तिघांविरुद्ध एमआयडीसी...