Sunday, May 31, 2026
Homeक्रीडानाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक जाहीर

नाशिक जिल्हा क्रिकेट संघटनेची निवडणूक जाहीर

नाशिक । प्रतिनिधी Nashik

- Advertisement -

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशन (Nashik District Cricket Association ) ची त्रैवार्षिक निवडणूक ( Election )जाहीर झाली आहे. पाच पदाधिकारी, 10 कार्यकारिणी सदस्य व 3 निवड समिती सदस्यांसाठी ही निवडणूक होते.नियोजित कार्यक्रमांनुसार प्रत्यक्ष मतदान 9 एप्रिल रोजी होणार असून, निकाल 10 एप्रिलच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत जाहीर केले जाणार आहेत.संघटनेच्या चेअरमनपदी 2003 पासून विनोद शहा हे सातत्याने विजय मिळवत आले आहेत.

नाशिक जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे 2900 सभासद असून, मागिल निवडणूकीत प्रथमच दोन पॅनलमध्ये निवडणूक रंगली होती. आरोप-प्रत्यारोपांची राळ मोठ्या प्रमाणात उडाली होती. मात्र या निवडणुकीत सत्ताधारी पॅनलने सर्व जागा जिंकल्या होत्या.

यंदा सत्ताधार्‍यांसमोर कोणाचे आव्हान येते हे पाहावे लागणार आहे. विरोधी गटांकडून पॅनल उभे करण्यासाठीची जुळवाजुळव सुरू झाली असल्याची चर्चा आहे. यामुळे यंदाही निवडणूक एकतर्फी होते की रंगतदार होते हे पाहणे औचित्याचे ंठरेल.

जाहीर करण्यात आलेल्या निवडणूक कार्यक्रमांनुसार सभासद मतदारांची यादी प्रसिद्ध करणे (28 मार्च), उमेदवारी अर्ज वाटप व स्वीकृती (30 मार्च) दुपारी 4.30 ते 5.30 पर्यंत, अर्जाची छाननी (31 मार्च), अर्ज माघारी घेण्याची मुदत (1एप्रिल),अंतिम उमेदवारी यादी व चिन्ह वाटप (3 एप्रिल),प्रत्यक्ष मतदान 9 एप्रिल सायंकाळी 5.30 पर्यंत केले जाणार आहे. त्यानंतर लगेचच मतमोजणीला (9 एप्रिल सायंकाळी 5.30 वाजेनंतर) प्रारंभ केला जाणार आहे. निवडणूकीचा निकाल 10 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड जाहीर होणार आहे.

ताज्या बातम्या

अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची...