नाशिक | प्रतिनिधी Nashik
नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचवटी अॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची रविवारी (दि.३१) ग्राहकांच्या प्रचंड आणि उत्स्फूर्त प्रतिसादात दिमाखात सांगता झाली.
पंचवटी येथील जत्रा चौफुली, नांदूर-लिंक रोडवरील रामलिला बँक्वेट हॉलमध्ये भरवण्यात आलेल्या या तीन दिवसीय प्रदर्शनाला नाशिककरांनी शेवटच्या दिवशीही भेट देत घरखरेदीसाठी गर्दी केली होती. प्रदर्शनात नाशिकमधील नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे बजेट होम्सपासून ते लक्झरी विला आणि कमर्शियल शॉप्सपर्यंतचे अनेक आकर्षक प्रकल्प एकाच छताखाली मांडण्यात आले होते. त्यामुळे आपल्या पसंतीच्या आणि बजेटमधील घराचा शोध घेणाऱ्या नाशिककरांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरली. रविवारी दुपारपासूनच नागरिकांनी सहकुटुंब प्रदर्शनाला हजेरी लावत विविध स्टॉल्सला भेटी दिल्या आणि प्रकल्पांची माहिती जाणून घेतली.
प्रदर्शनाचा शेवटचा दिवस अत्यंत उत्साहात पार पडला. सहभागी झालेल्या सर्व स्टॉल धारकांना मान्यवरांच्या हस्ते स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी नरेडको नाशिकचे सेक्रेटरी भाविक ठक्कर, देशदूतचे जाहिरात महाव्यवस्थापक अमोल घावरे, जाहिरात सहाय्यक महाव्यवस्थापक मिलिंद वैद्य, मार्केटिंग ऑफिसर भगवंत जाधव, आनंद कदम, समीर पाराशारे उपस्थित होते. प्रदर्शन यशस्वीतेसाठी प्रशांत अहिरे, विशाल जमधडे आदींनी परिश्रम घेतले. नाशिककरांच्या गृहस्वप्न पूर्तीला गती देत आणि बांधकाम व्यावसायिक व ग्राहक यांच्यात विश्वासाचा सेतू बांधत या प्रॉपर्टी एक्स्पोची सांगता झाली.

























