Sunday, May 31, 2026
HomeनगरOnion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

Onion Rate : राहाता बाजार समितीत कांद्याची आवक; वाचा भाव

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

- Advertisement -

रविवारी राहाता बाजार समितीत (Rahata Market Committee) कांद्याला प्रतिक्विंटल सर्वाधिक 2100 रुपये भाव मिळाला. कांद्याची (Onion) 4838 गोण्यांची आवक झाली. कांदा नंबर एकला 1600 ते 2100 रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला. कांदा (Onion) नंबर दोनला 1000 ते 1550 रूपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 400 ते 950 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 700 ते 1200 रुपये. जोड कांदा 250 ते 500 रुपये प्रति क्विंटलला भाव मिळाला.

कांद्याच्या (Onion) 14 गोण्यांना 2001 ते 2100 रुपये भाव मिळाला. 34 गोण्यांना 1901 ते 2000 रुपये भाव मिळाला. 17 गोण्यांना 1801 ते 1900 रुपये भाव मिळाला. 40 गोण्यांना 1701 ते 1800 रुपये भाव मिळाला. 82 गोण्यांना 1601 ते 1700 रुपये भाव मिळाला. 147 गोण्यांना 1501 ते 1600 रुपये भाव मिळाला. 121 गोण्यांना 1401 ते 1500 रुपये भाव मिळाला. 370 गोण्यांना 1301 ते 1400 रुपये भाव मिळाला. 275 गोण्यांना 1201 ते 1300 रुपये भाव मिळाला. 307 गोण्यांना 1101 ते 1200 रुपये भाव मिळाला. 274 गोण्यांना 1001 ते 1100 रुपये भाव मिळाला. 1581 गोण्यांना 501 ते 1000 रुपये भाव मिळाला. 1576 गोण्यांना 100 ते 500 रुपये भाव मिळाला.

डाळिंबाच्या (Pomegranate) 798 कॅरेटची आवक झाली. डाळिंब (Pomegranate) नंबर 1 ला 161 रुपये ते 205 रुपये प्रतिकिलोला भाव मिळाला. डाळिंब नंबर 2 ला 111 ते 160 रुपये भाव मिळाला. डाळिंब (Pomegranate) नंबर 3 ला 51 रुपये ते 110 रुपये भाव मिळाला. डाळिंब नंबर 4 ला 10 ते 50 रुपये प्रति किलो असा भाव मिळाला, अशी माहिती बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर व सचिव सुभाष मोटे यांनी दिली.

ताज्या बातम्या

अभूतपूर्व प्रतिसादात ‘देशदूत पंचवटी प्रॉपर्टी एक्स्पो’ची सांगता

0
नाशिक | प्रतिनिधी Nashik नाशिकमधील नागरिकांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्यासाठी दैनिक ‘देशदूत’च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘पंचवटी अ‍ॅनेक्स (जत्रा चौफुली) प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ची...