Tuesday, September 8, 2026
Homeनगरमंत्री भरत गोगावले यांनी घेतले सपत्नीक शनिदर्शन

मंत्री भरत गोगावले यांनी घेतले सपत्नीक शनिदर्शन

शनिशिंगणापूर |वार्ताहर| Shanishinganapur

राज्याचे रोजगार हमी मंत्री ना. भरत गोगावले (Employment Guarantee Minister Bharat Gogavale) यांनी सपत्नीक शनि दर्शन (Shani Darshan) घेतले. याप्रसंगी आमदार विठ्ठलराव लंघे उपस्थित होते. देवदर्शन झाल्यानंतर देवस्थानच्या जनसंपर्क कार्यालयात देवस्थानचे अध्यक्ष भागवत बानकर, सरचिटणीस आप्पासाहेब शेटे यांनी मंत्री ना.गोगावले व आ.लंघे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पुनतगाव येथील शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने संजय वाघमारे यांनी तर मराठा महासंघाचे राज्य संपर्कप्रमुख संभाजी दहातोंडे, अ‍ॅड.सयाराम बानकर यांनी तुकाराम महाराजांची पगडी व भगवी शाल देऊन मंत्री ना. गोगावले (Employment Guarantee Minister Bharat Gogavale) यांचा सन्मान केला.

- Advertisement -

याप्रसंगी भाऊसाहेब वाघ, बाळासाहेब पवार, अ‍ॅड. बापूसाहेब दारकुंडे, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस सचिन देसरडा, नेवासा शहर प्रमुख संजय शिंदे, ऋषी शेटे आदी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक खगेन्द्र टेभेकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक विजय माळी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दर्शनाने मनस्वी समाधान झाल्याचे मंत्री ना.गोगावले यांनी नमुद केले.

ताज्या बातम्या

Ahilyanagar : गावगाडा आता कुणाच्या हाती?

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबणीवर पडल्याने जिल्ह्यातील 753 ग्रामपंचायतींच्या कारभाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. निवडणुका होईपर्यंत गावांचा कारभार सुरळीत चालावा, यासाठी नियुक्त करण्यात...