Wednesday, January 15, 2025
Homeनाशिकमुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या गोरखपूर काशी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे...

मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या गोरखपूर काशी एक्स्प्रेसच्या इंजिनमध्ये बिघाड; आवाज झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण

इगतपुरी । प्रतिनिधी
इगतपुरी रेल्वे स्थानकातुन (Igatpuri Railway Station) मुंबईहुन नाशिककडे जाणाऱ्या मुंबई गोरखपुर काशी एक्सप्रेसला (Gorakhpur Kashi Express) घोटी रेल्वे (Ghoti Railway Station) स्थानकादरम्यान सोमवार दि. २ रोजी सकाळी धावत्या ट्रेनच्या इंजिनमध्ये आवाज व आग लागल्याची अचानक घटना घडल्याने प्रवाशांमध्ये घबराट पसरली होती. काशी एक्स्प्रेसचे इंजिनमध्ये बिघाड झाल्याचे निदर्शनास येताच रेल्वे प्रशासन व इगतपुरी नगरपरिषद अग्नीशमन दलाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यात आल्याने मोठा अनर्थ टळला. या घटनेत प्रवाशांची घटनास्थळी एकच गर्दी झाल्याने अनेक प्रवाशी भयभीत झाल्याचे दिसुन आले.

डाऊन एक्सप्रेस १५०१७ क्रमांक गोरखपूर काशी एक्स्प्रेस इगतपुरी रेल्वेस्थानक येथून सकाळी ९:४२ वाजता निघाली होती. मात्र घोटी रेल्वे स्टेशन दरम्यान धावत्या ट्रेनमध्ये सदर ट्रेनचे इंजिन ३९०५० क्रमांक असलेल्या इंजिन कॅबीनमध्ये बिघाड झाल्याने हारमोनिक फिल्टरमध्ये फटाख्या सारखा मोठ मोठ्याने आवाज येऊन आग लागली. तसेच, धूर निघू लागल्याने सदर एक्सप्रेसचे चालक एन. सी. दयाळ आणि सहाय्यक लोको पायलट अरविंद कुमार यांनी तात्काळ घोटी रेल्वे यार्ड-स्टेशन दरम्यान मेन लाईनवर ट्रेन ९.५७ वाजता थांबवून इंजिनचे पेंडलूम सुरक्षेच्या दृष्टीने खाली करून इंजिनमधील आग विझवण्याचे उपकरणाचे सहाय्याने आग विझवली. तसेच, घोटी रेल्वेचे एस एन टी विभागाचे कर्मचारी यांनीही आग विझवण्यासाठी लगेच मदत कार्य केले.

- Advertisement -

दरम्यान, एक्सप्रेसला जोडण्यात आलेले इंजिनचे हारमोनिक फिल्टरमध्ये लागलेली आग लगेच विझवण्यात आल्याने मोठी दुर्घटना टळली. इंजिन तपासणी नंतर काशी एक्स्प्रेसला घोटी रेल्वे स्टेशन येथून दुसरे इंजिन लावण्यात आले व नाशिकरोडकडे पुढे नेण्यात आले. या घटनेत लोहमार्ग पोलीस ठाण्याचे पोलीस अधिकारी बालाजी शेंडगे व स्टेशन प्रबंधक, रेल्वे कर्मचारीसह नगर परिषद, संबंधीत अधिकारी यांनी परिश्रम घेतले.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या