Friday, June 20, 2025
Homeमुख्य बातम्या"तूझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये..."; दिग्गज मराठी अभिनेत्याने मेसेज केल्याचे अभिनेत्री प्राची...

“तूझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झालीये…”; दिग्गज मराठी अभिनेत्याने मेसेज केल्याचे अभिनेत्री प्राची पिसाटचे आरोप

मुंबई | Mumbai

बॉलिवूडमध्ये (Bollywood) सहकलाकारांसोबत अश्लील वर्तनाच्या अनेक घटना घडल्याचे बऱ्याचदा बघायला मिळते. यानंतर या घटना माध्यमांमध्ये झळकल्यावर त्याची चर्चा होते. त्यानंतर अश्लील वर्तन झालेल्यांना त्याला सामोरे जाऊन उत्तर द्यावे लागते. अशीच एक घटना आता पुन्हा एकदा समोर आली आहे. झी मराठी वाहिनीवरील ‘तू चाल पुढं’ या मालिकेत ताराची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राची पिसाट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

- Advertisement -

प्राचीला फेसबुकवर प्रसिद्ध अभिनेते सुदेश म्हशीलकर (Sudesh Mhashilkar) यांनी एक मेसेज केला होता. सुदेश म्हशीलकर हे मराठी कलाविश्वातील दिग्गज अभिनेते (Actress) असून सध्या ते स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘कोण होतीस तू काय झालीस तू’ या मालिकेमध्ये काम करत आहेत. यानंतर आता सुदेश म्हशीलकर यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट इन्स्टाग्रामवर शेअर करत प्राची पिसाटने त्यांची चांगलीच शाळा घेतली आहे. या स्क्रीन शॉटमध्ये ‘तुझा नंबर पाठव ना. तुझ्याशी फ्लर्ट करायची इच्छा झाली, कसली गोड दिसते’, असा मेसेज सुदेश यांच्या अकाऊंटवरून प्राचीला करण्यात आला आहे. तसेच हे स्क्रीनशॉट व्हायरल होताच नेटकरी या प्रकरणावर संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

सुदेश (Sudesh) यांच्या मेसेजचा स्क्रीनशॉट शेअर करत प्राचीने लिहिले की, “‘आणि मला हा स्क्रिनशॉट पोस्ट करायची इच्छा झाली…बायकोचा नंबर असलेच…ती ही गोड आहे…बघ जरा तिच्याशी फ्लर्ट करायला जमतंय का…ही पोस्ट डिलीट कर सांगायला कुठून तरीनंबर मिळवशील आणि कॉल करशीलच’ असे त्यामध्ये लिहिले आहे. मात्र, सुदेश यांच्यावर त्यांच्या चाहत्यांनी विश्वास दाखवला असून, त्याचं अकाउंट हॅक झाले असल्याच्या चर्चा आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prachi Pisat (@prachipisat11.11)

दरम्यान, प्राचीला तिच्या फेसबुक मेसेंजरमध्ये ७ एप्रिल रोजी सुदेश यांचा आणखी एक मेसेज आला होता. त्याचाही स्क्रीनशॉट तिने शेअर केला आहे. त्यात सुदेश यांनी म्हटलंय, ‘खूपच सेक्सी दिसायला लागलीयेस हल्ली, वाह!’ या स्क्रीनशॉटवर प्राचीने म्हटलंय, ‘हो.. आणि खूप बोलायलाही लागलीये हल्ली. चुकीच्या मुलीशी पंगा घेतलाच काका. चुकलंच नाही का तुमचं? असे म्हणत प्राचीने सुदेश यांच्याकडे जाहीर माफीची मागणी केली आहे. दुसरीकडे हे मेसेज सुदेश यांनीच केले आहेत की त्यांचं अकाउंट हॅक झालं आहे?हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Bhandardara : भंडारदरात जोरदार पाऊस; वाकी, पिंपळगाव खांड ओव्हरफ्लो

0
भंडारदरा |वार्ताहर| Bhandardara भंडारदरा धरण परिसरात गत तीन दिवसांपासून पावसाची जोरदार बॅटींग सुरू असल्याने धरणात नव्याने पाण्याची आवक सुरू आहे. 11039 दलघफू क्षमतेच्या भंडारदरात काल...