Thursday, December 12, 2024
Homeदेश विदेशExit Polls 2024 : देशात मोदी मॅजिक कायम; इंडिया आघाडी अडखळली

Exit Polls 2024 : देशात मोदी मॅजिक कायम; इंडिया आघाडी अडखळली

महाराष्ट्रात महायुतीची सरशी, एनडीए ३५० प्लस तर इंडिया आघाडीला १५० ते १५० जागा

मुंबई | Mumbai

लोकसभेच्या (Loksabha) ५४३ जागांसाठी देशात सात टप्प्यांमध्ये मतदान (Voting) झाले. आज शेवटच्या टप्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतर मतदानोत्तर चाचण्यांचे अंदाज समोर आले आहेत. २७२ हा बहुमताचा आकडा कोण गाठू शकेल?, रालोआ विरुद्ध इंडिया आघाडी अशा महामुकाबल्यात कोण बाजी मारेल?, पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्ता राखण्यात यशस्वी होतील की विरोधक धक्का देतील?, ४०० पार ‘चा नारा देणारा भाजप कुठपर्यंत मजल मारू शकेल?, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, बिहार, पश्चिम बंगाल या मोठ्या राज्यामध्ये काय होणार?, याची देशात उत्सुकता आहे. ४ जूनला या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील, पण देशाचा साधारण कल जाणून घेण्यासाठी मतदानोत्तर चाचण्यांकडेही सगळ्यांचे लक्ष आहे. या सर्वच मतदानोत्तर चाचण्यांमध्ये ३५० पेक्षा अधिक जागा जिंकून एनडीए तिसऱ्यांदा सरकार स्थापन करेल, तर इंडिया आघाडीला १२५ ते १५० जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

- Advertisement -

या अंदाजात केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजप खाते उघडण्याची शक्यता आहे. एबीपी-सी बोटरच्या एक्झिट पोलमध्ये केरळमध्ये एनडीएला एक ते तीन जागा मिळण्याचा अंदाज आहे, तर यूडीएफला १७ ते १९जागा, एलडीएफला ३३ आणि ३९ इतरांना शून्य जागा मिळण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशात इंडिया आघाडीला एक ते तीन जागा मिळण्याचा तर एनडीएला २६ ते २८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तेलंगणामध्ये एनडीएला सात ते नऊ जागा, इंडिया आघाडीला सात ते नऊ जागा आणि इतरांना ० ते एक जागा मिळत आहेत. तर टक्केवारीमध्ये एनडीएला ३३ टक्के, इंडिया आघाडीला ३९ टक्के, बीआरएसला २० टक्के, एआयएमआयएमला २ टक्के आणि इतरांना ६ टक्के मते मिळण्याचा अंदाज आहे.

आंध्र प्रदेशात एनडीएला ५३ टक्के, भारतीय आघाडीला ३ टक्के, वायएसआरसीपीला ४२ टक्के आणि इतरांना २ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. जागांचा आकडा पाहिल्यास एनडीएला येथे बहुमत मिळताना दिसत आहे. आंध्र प्रदेशात २१ ते २४ जागा एनडीएच्या खात्यात जाणार आहेत. तर, वायएसआरसीपीला ० ते ४ जागा मिळण्याचा अंदाज आहे. आंध्र प्रदेशमध्ये इंडिया आघाडी आपले खाते न उघडण्याची शक्यता आहे. एक्झिट पोलनुसार कर्नाटकातही भाजपाच्या ‘कमळा’लाच ‘अच्छे दिन’ येताना दिसत आहेत. कर्नाटकातील २८ जागांपैकी २० ते २२ जागा भाजपाला, ३ ते ५ जागा काँग्रेसला, ३ जागा जेडीएसला मिळतील, असा अंदाज आहे.

उत्तर प्रदेशात एनडीएला ६२ तर इंडिया आघाडीला १८ जागा मिळतील, तर बिहारमध्ये एनडीएला २८ ते ३३ तर इंडिया आघाडीला ७ ते ११ जागा मिळण्याचा अंदाज आहे. हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंडमध्ये भाजपचा दबदबा राहणार आहे. दिल्लीत अरविंद केजरीवाल फॅक्टर निष्प्रभ ठरणार असून भाजपला ६ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. पंजाबमध्ये शेतकरी आंदोलनाचा भाजपला मतदानाच्या टक्केवारीत फटका बसणार आहे. मात्र, जागांमध्ये सरशी राहील. आसाममधील १४ जागांपैकी १० ते १२ जागा भाजपाप्रणित एनडीएला मिळतील, तर इंडीया आघाडीला २ ते ४ जागा मिळू शकतात, असा एक्झिट पोलचा अंदाज आहे.

त्याचप्रमाणे, ईशान्य भारतातील एकूण ११ जागांपैकी एनडीए ६ ते ९ जागा, इंडिया १ ते ३ जागा तर इतर पक्ष १ ते २ जागा जिंकू शकतील. तसेच एक्झिट पोलनुसार, गोव्यातील दोन लोकसभा जागांपैकी एनडीए एक किंवा दोन्ही जागा जिंकू शकते. पण, मतांच्या टक्केवारीत इंडिया आघाडी पुढे असल्याने (४५ टक्के एनडीए, ४६ टक्के इंडिया) एखादी जागा त्यांच्या पारड्यातही पडू शकते. गुजरातमध्ये भाजपाप्रणित एनडीएला ६३ टक्के मते मिळतील आणि त्या जोरावर ते २६ पैकी २५ किंवा पैकीच्या पैकी जागा जिंकतील, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.

महाराष्ट्रात महायुतीची सरशी

महाराष्ट्रात यंदाच्या निवडणुकीत्त मोठी उलथापालथ पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मागच्या निवडणुकीत ४१ जागा मिळवणाऱ्या भाजपप्रणीत महायुतीला यंदाच्या निवडणुकीत २२ ते २६ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर महाविकास आघाडी २३ ते २४ जागा मिळवेल, असा अंदाज एबीपी न्यूज-सी व्होटरच्या एक्झिट पोलचा आहे. महाराष्ट्रात यंदाची लोकसभा निवडणूक ऐतिहासिक ठरली. कारण राज्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन मोठे पक्ष फुटल्यानंतर होत असलेली ही पहिलीच मोठी निवडणूक होती. त्यामुळे या निवडणुकीत नक्की कोण बाजी मारणार, याकडे राज्यासह संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. पक्षफुटीची सहानुभूती महाविकास आघाडीला मिळेल, तर संघटनात्मक ताकदीचा फायदा महायुतीला होईल, असे बोलले जात होते. एक्झिट पोलच्या अंदाजातही याचे प्रतिबिंच दिसत असून राज्यात महाविकास आघाडी आणि महायुतीत चुरशीची लढत झाली आहे.

एबीपी न्यूज-सी व्होटरच्या एक्झिट पोलनुसार, महाराष्ट्रात भाजपला १७, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सहा तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एक जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मात्र ही एक जागा कोणती असेल याबाबत अद्याप स्पष्टता नाही. तर दुसरीकडे महाविकास आघाडीतील काँग्रेस आठ, शरद पवार यांची राष्ट्रवादी सहा आणि उद्धव ठाकरे यांची शिवसेना नऊ जागांवर जिंकू शकते. तसेच एका जागेवर अपक्ष उमेदवाराचा विजय होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. टीव्ही ९ पोलस्ट्रॅटच्या एक्झिट पोलनुसार, बारामतीतून राष्ट्रवादी शरदवंद्र पवार पक्षाच्या सुप्रिया सुळे यांचा विजय होईल. तसेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचा बारामतीसह ते लढवत असलेल्या शिरूर, रायगड आणि उस्मानाचाद या चारही मतदारसंघांमध्ये पराभव होईल. या एक्झिट पोलने शरद पवारांच्या राष्ट्रबादीला सहा जागांचा अंदाज वर्तवला आहे.

इंडिया आघाडी २९५ जागा जिंकेल – खरगे

लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदानादरम्यान दिल्लीत इंडिया ब्लॉकची मोठी बैठक झाली. दक्षिण दिल्लीत राजाजी मार्गावरील काँग्रेस प्रदेशाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या निवासास्थानी झालेल्या या बैठकीला आघाडीत समाविष्ट अनेक पक्षांचे नेते उपस्थित होते. बैठकीनंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना खरगे यांनी दावा केला की, इंडिया आघाडी २९५ जागा जिंकेल. या बैठकीत इंडिया ब्लॉकचे अनेक नेते उपस्थित होते. यामध्ये काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी, के, सी. वेणुगोपाल, समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार, जितेंद्र आव्हाड, आआपाचे संस्थापक दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान, संजय सिंह, राघव चड्ढा, द्रमुकचे टी.आर. बालू, आरजेडीचे तेजस्वी यादव आणि संजय यादव, जेएमएमकडून चंपाई सोरेन आणि कल्पना सोरेन, नॅशनल कॉन्फरन्सचे फारूख अब्दुल्ला, सीपीआयचे डी. राजा, सीपीआय (एम) कडून सीताराम येचुरी, शिवसेनेकडून अनिल देसाई (उद्धव ठाकरे गट) आदी उपस्थित होते. तर तृणमूल काँग्रेस या बैठकीपासून दूर राहिली.

संस्थाएनडीएइंडिया आघाडीइतर
एबीपी- सीवोटर२७८-३३०१२६-१७४०४-१२
रिपब्लिक मॅट्रीझ३५३-३६८११८-१३३४३-४८
जनकी बात३६२-३९२१४१-१६११०-२०
न्यू नेशन३४२-३७८१५४-१६९२१-२३
इंडिया टुडे – अॅक्सिस१९१-२१४ ८७-११० ०६-१०
इंडिया टिव्ही३७१-४०१ १०९-१३९ २८-३८
दैनिक भास्कर२८१-३५० १४५-२०१ ३३-४९
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या