Tuesday, November 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजमहाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाचा राज्यभर विस्तार; ३० जिल्हा, शहराध्यक्ष नियुक्त,...

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या वैद्यकीय मदत कक्षाचा राज्यभर विस्तार; ३० जिल्हा, शहराध्यक्ष नियुक्त, प्रा. ज्ञानेश्वर गायकवाडांची प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या (Maharashtra Pradesh Congress Medical Aid Cell) माध्यमातून राज्यभरातील गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचार, शासकीय आरोग्य योजनांचा लाभ, आर्थिक सहाय्य व योग्य उपचारांसाठी मार्गदर्शन मिळवून देण्याच्या उद्देशाने संघटनात्मक विस्ताराला गती देण्यात आली आहे. या अनुषंगाने राज्यातील विविध जिल्हे व शहरांमध्ये ३० जिल्हाध्यक्ष व शहराध्यक्षांच्या नियुक्त्यांना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Sapkal) यांनी मान्यता दिली आहे.

- Advertisement -

वैद्यकीय मदत कक्षाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर रामकृष्ण गायकवाड (Dnyaneshwar Gaikwad) यांची त्यांच्या आतापर्यंतच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करत प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती करण्यात आली आहे. तसेच संघटनात्मक कार्याचा विस्तार आणि वैद्यकीय मदत कक्षाच्या कामाची व्याप्ती वाढविण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडे विदर्भ विभागाची संपूर्ण जबाबदारीही सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये वैद्यकीय मदत कक्षाचे संघटनात्मक जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येणार आहे.

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्या प्रेरणेने वैद्यकीय मदत कक्षाचे काम राज्यभर विस्तारले जात आहे. प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांनी गेल्या काही महिन्यांत विविध जिल्ह्यांमध्ये पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, संघटनात्मक बांधणी आणि रुग्णसेवेच्या उपक्रमांना गती देण्यासाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या नियुक्त्यामुळे ग्रामीण तसेच शहरी भागातील रुग्णांना स्थानिक स्तरावर मदत मिळणे अधिक सुलभ होणार असून, काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आरोग्यविषयक प्रश्नांना संघटितपणे हाताळण्यास मदत होणार आहे.

नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करावे – सपकाळ

काँग्रेस पक्ष हा सर्वसामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष करणारा पक्ष आहे. आरोग्य आणि वैद्यकीय उपचार हा प्रत्येक नागरिकाचा महत्त्वाचा प्रश्न आहे. आर्थिक परिस्थितीमुळे कोणत्याही गरजू रुग्णाला उपचारांपासून वंचित राहावे लागू नये, ही आमची भूमिका आहे. वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात सक्षम संघटनात्मक यंत्रणा उभी राहिल्यास गरजू रुग्णांना मोठा आधार मिळेल. नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सेवाभावी वृत्तीने काम करून रुग्णांना दिलासा द्यावा.

वैद्यकीय मदत कक्षाला लोकाभिमुख बनवावे – थोरात

राजकारण हे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत मदत आणि आधार पोहोचविण्याचे प्रभावी माध्यम आहे. वैद्यकीय मदत कक्षाचे कार्य हे समाजसेवेच्या भावनेतून सुरू करण्यात आलेले महत्त्वपूर्ण काम आहे. अनेक कुटुंबांना गंभीर आजारपणाच्या काळात आर्थिक आणि प्रशासकीय अडचणींचा सामना करावा लागतो. अशा वेळी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या पाठीशी उभे राहणे आवश्यक आहे. राज्यभर नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करून वैद्यकीय मदत कक्षाला लोकाभिमुख बनवावे.

गायकवाड यांच्याकडून काँग्रेस नेतृत्त्वाचे आभार

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय मदत कक्षाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात रुग्णसेवेचे सक्षम संघटनात्मक जाळे निर्माण करण्याचा संकल्प केला आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी माझ्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त करून प्रदेशाध्यक्षपदी फेरनियुक्ती केली, तसेच विदर्भ विभागासह संपूर्ण राज्याची जबाबदारी सोपविली, ही माझ्यासाठी विश्वासाची आणि जबाबदारीची बाब आहे. ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शन आणि सहकार्य आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात वैद्यकीय मदत कक्ष सक्षम करणे, जिल्हा व तालुका स्तरावर संघटनात्मक बांधणी करणे आणि गरजू रुग्णांना प्रत्यक्ष मदत मिळवून देणे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. नवनियुक्त जिल्हाध्यक्षांनी केवळ पदापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष रुग्णसेवेला प्राधान्य द्यावे. विविध शासकीय आरोग्य योजनांचा लाभ मिळवून देणे, रुग्णालयांशी समन्वय साधणे आणि गरजू रुग्णांना योग्य मार्गदर्शन करणे ही प्रमुख जबाबदारी असेल. महाराष्ट्रातील कोणताही गरजू रुग्ण केवळ माहितीच्या अभावामुळे किंवा आर्थिक अडचणीमुळे उपचारांपासून वंचित राहू नये, यासाठी वैद्यकीय मदत कक्ष कटिबद्ध राहील.

रुग्णसेवेला संघटनात्मक स्वरूप देण्याचा संकल्प

वैद्यकीय मदत कक्षाच्या माध्यमातून आगामी काळात जिल्हास्तरीय कार्यकारिणी, तालुकास्तरीय समन्वय यंत्रणा, रुग्णालय संपर्क व्यवस्था, वैद्यकीय मार्गदर्शन शिबिरे आणि शासकीय आरोग्य योजनांविषयी जनजागृती उपक्रम राबविण्याचे नियोजन आहे. तसेच गरजू रुग्णांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी प्रदेश आणि जिल्हा स्तरावर समन्वय साधला जाणार आहे. राज्यातील विविध जिल्हे व शहरांमध्ये ३० पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांना मिळालेली मान्यता, प्रदेशाध्यक्ष प्रा. ज्ञानेश्वर गायकवाड यांची फेरनियुक्ती आणि विदर्भ विभागाची अतिरिक्त जबाबदारी ही महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वैद्यकीय मदत कक्षाच्या संघटनात्मक विस्तारातील महत्त्वपूर्ण पायरी मानली जात आहे. समाजातील गरजू आणि वंचित घटकांना आरोग्यसेवेचा आधार देण्याच्या दिशेने हा उपक्रम कार्यरत राहणार आहे.

नवनियुक्त जिल्हा व शहराध्यक्ष (कोकण, मुंबई व पश्चिम महाराष्ट्र)

१. राजेंद्र प्रभाकर मसुरकर – सिंधुदुर्ग जिल्हा
२. डॉ. निखिल नंदकिशोर गांधी – मीरा-भाईंदर शहर
३. डॉ. प्रशांत केवळशंकर यादव – ठाणे शहर
४. जॉर्ज विल्सन लोंढे – ठाणे ग्रामीण
५. विनोद करुणाकरन पिल्लई – डोंबिवली शहर
६. डॉ. सफराज गोटे – रत्नागिरी उत्तर
७. दिग्विजय अशोकराव सूर्यवंशी – सातारा जिल्हा
८. स्वरूप संभाजी लेंढघर – पुणे ग्रामीण दक्षिण
९. मारुती दुबाजी वायाळ – पुणे ग्रामीण उत्तर

उत्तर महाराष्ट्र

१०. प्रवीण नारायण काटे – नाशिक शहर
११. निरंजन सतीश आहेर – नाशिक ग्रामीण उत्तर (पूर्व) – नांदगाव, मनमाड, बागलाण, मालेगाव व देवळा तालुके
१२. दत्तात्रय आनंदा चव्हाण – नाशिक ग्रामीण उत्तर (पश्चिम) – कळवण, सुरगाणा, पेठ व दिंडोरी तालुके
१३. प्रा. वैकुंठ भास्करराव चोपडे – नाशिक ग्रामीण दक्षिण
१४. झुल्फेकार शेख – मालेगाव शहर
१५. संदीप भारत कुमावत – जळगाव शहर
१६. किरण प्रतापराव सोनवणे – जळगाव ग्रामीण पूर्व
१७. शेख कलीम शेख हुसेन – जळगाव ग्रामीण पश्चिम
१८. रामकृष्ण भगवानसिंग चव्हाण – नंदुरबार जिल्हा
१९. भगवंतराव वामनराव सोनवणे (आबा मुंडे) – धुळे ग्रामीण
२०. आप्पा रामदास ढोबे – अहिल्यानगर ग्रामीण दक्षिण
२१. डॉ. मनोज दादाभाऊ लोंढे – अहिल्यानगर शहर

मराठवाडा

२२. अमिन नजमोहीन पठाण – छत्रपती संभाजीनगर शहर
२३. डॉ. अभिजीत किशोर पवार – छत्रपती संभाजीनगर ग्रामीण
२४. डॉ. गणेश गोविंदराव वाघ – जालना शहर
२५. डॉ. घनश्याम राजाराम पांढरे – जालना ग्रामीण
२६. बाजीराव नवनाथ ढाकणे – बीड जिल्हा
२७. डॉ. सारंग सुरेश रामदवे – धाराशिव जिल्हा
२८. शेख अजीम शेख सलीम – हिंगोली जिल्हा
२९. डॉ. मोहम्मद असिफ मोहम्मद इब्राहिम – नांदेड शहर
३०. दीपक बालाजी पवार – नांदेड ग्रामीण उत्तर

ताज्या बातम्या