Tuesday, November 24, 2026
HomeनाशिकNashik Fire News : हिरावाडीतील वज्रेश्वरी झोपडपट्टीत आगीचा भडका; सहा घरे जळून...

Nashik Fire News : हिरावाडीतील वज्रेश्वरी झोपडपट्टीत आगीचा भडका; सहा घरे जळून खाक, सिलिंडरचा स्फोट

अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला

पंचवटी | प्रतिनिधी | Panchvati

भिकुसा मिलजवळील हिरावाडी रोड परिसरातील (Hirawadi Road Area) वज्रेश्वरी झोपडपट्टीतील वाल्मिकनगर येथे मंगळवारी अचानक आग (Fire) लागून सहा घरांचे मोठे नुकसान झाले. आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण करीत आजूबाजूच्या घरांनाही विळखा घातला. दरम्यान, एका घरातील गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाल्याने मोठा अनर्थ टळला. जवानांनी शर्थीचे प्रयत्न करीत आगीवर नियंत्रण मिळविले तसेच आजूबाजूची इतर घरे आगीच्या भक्ष्यस्थानी जाण्यापासून वाचविण्यात यश मिळविले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.

- Advertisement -

या आगीत एकूण सहा घरांना फटका बसला असून, घरातील संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले. यामध्ये गाद्या, पंखे, टीव्ही यांसह अन्य वस्तूंचे मोठे नुकसान झाले. काही घरांमधील भांडी व इतर साहित्य वाचविण्यात नागरिकांना यश आले. अचानक लागलेल्या आगीमुळे रहिवाशांची मोठी धावपळ उडाली. आगीचे लोळ आणि धुराचे लोट परिसरात पसरल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.

घटनेची माहिती मिळताच पंचवटी अग्निशमन केंद्राचे (Panchavati Fire Station) केंद्रप्रमुख हर्षद पटेल, लीडिंग फायरमन संजय कानडे, सुनील शिलावट, संदीप जाधव, कर्मचारी प्रथमेश गवळे, ऋषिकेश जाधव तसेच केंद्रप्रमुख प्रदीप बोरसे, लीडिंग फायरमन मंगेश पिंपळे, व्ही. पी. शिंदे आणि वाहनचालक बी. बी. काकडे यांनी घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आगीचा फैलाव रोखण्यात आणि शेजारील घरांचे संरक्षण करण्यात यश आले.

या आगीत शांताबाई सखाराम जाधव, मीना मोरे, सुनीता जाधव, मोहन धोत्रे, आशा मिरजकर, दिलीप पवार आणि नर्मदा इंगोले आदी रहिवाशांच्या घरांचे नुकसान झाले. दरम्यान, प्रभागातील लोकप्रतिनिधींनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली व बाधित कुटुंबांची विचारपूस केली. यावेळी नगरसेवक गौरव गोवर्धने, मच्छिंद्र सानप,प्रियांका माने, जुई शिंदे आदी उपस्थित होते.

सुदैवाने जीवितहानी टळली

झोपडपट्टीतील (Slum Area) दाटीवाटीची वस्ती आणि एका घरातील सिलिंडरचा झालेला स्फोट यामुळे आग अधिक भडकण्याची शक्यता होती. मात्र, अग्निशमन दलाच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहोचून आगीवर नियंत्रण मिळविल्याने संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

ताज्या बातम्या

रोजगाराच्या

Nashik News: सिंहस्थाच्या तयारीत रोजगाराच्या संधी बंद; टपऱ्यांना परवानगी देण्यास मनपाचा...

0
नाशिक | प्रतिनिधीआगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील रस्ते आणि पदपथ अतिक्रमणमुक्त ठेवण्यासाठी महापालिका प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. बेरोजगार तरुणांना चहा...