- Advertisement -
मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र महिलांना 30 सप्टेंबर 2024 अर्ज करता येईल. महिला आणि बालविकास विभागाने सोमवारी यासंदर्भातील शासन आदेश जारी केला.
राज्य सरकराने जून महिन्यात राज्याचा सन 2024-25 या वर्षाचा अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची घोषणा केली होती. या योजनेनुसार पात्र महिलांच्या बँक खात्यात महिना 1 हजार 500 रुपये जमा करण्यात येणार आहेत. राज्य सरकारने 1 जुलै 2024 पासून या योजनेची अंमलबजावणी सुरु केली. सरकारच्या या योजनेला राज्यभरातील महिलांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.