Saturday, September 19, 2026
Homeक्राईमCrime News : खंडणीसाठी अडवून जबरी चोरी करणारा मुख्य संशयित गजाआड

Crime News : खंडणीसाठी अडवून जबरी चोरी करणारा मुख्य संशयित गजाआड

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

खंडणीची मागणी करून काठी व लोखंडी टॉमीने मारहाण करत रोख रक्कम जबरीने काढून घेतल्याप्रकरणी पसार असलेल्या मुख्य संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने गुरूवारी (17 सप्टेंबर) शिंगवे तुकाई (ता. नेवासा) परिसरातून ताब्यात घेतले. प्रतिक गोकुळ पाचपुते (वय 25, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा) असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीचा सातारा, सांगली, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यांत शोध घेण्यात आला होता.

- Advertisement -

5 सप्टेंबर रोजी फिर्यादी विजय भाऊसाहेब शेळके (वय 41, रा. गुणवडी, ता. अहिल्यानगर) हे श्रीगोंदा येथून घरी जात होते. रस्त्यावर प्रतिक पाचपुते व त्याच्या साथीदारांनी शेळके व साक्षीदारांना अडविले. 50 हजार रूपयांची खंडणी मागितली. फिर्यादीने खंडणीची रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्यांच्याकडील रोख रक्कम जबरीने काढून घेतली. या घटनेप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी स्थानिक गुन्हे शाखेला पसार आरोपींचा शोध घेण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार निरीक्षक संतोष मुटकुळे यांनी पोलीस उपनिरीक्षक कृष्णकुमार सेदवाड यांच्या नेतृत्वाखाली दोन पथके तयार केली.

या पथकांमध्ये पोलीस अंमलदार अतुल लोटके, राहुल व्दारके, निळकंठ कारखेले, शाहीद शेख, बाळासाहेब नागरगोजे, अजिनाथ पाखरे, अमोल कोतकर, प्रताप देवकाते, सागर ससाणे आणि मनोज साखरे यांचा समावेश होता. गुन्हा दाखल झाल्यापासून प्रतिक पाचपुते पसार होता. तो वारंवार राहण्याचे ठिकाण बदलत असल्याने पोलिसांना त्याचा ठावठिकाणा मिळत नव्हता. दरम्यान, गुरूवारी प्रतिक पाचपुते हा नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई परिसरात येणार असल्याची माहिती एलसीबी पथकाला मिळाली. त्यानंतर त्याला ताब्यात घेण्यात आले.

ताज्या बातम्या

सख्खा भाऊ पक्का वैरी! दारूच्या व्यसनातून लहान भावानेच केला मोठ्या भावाचा...

0
उक्कलगाव (वार्ताहर ) दारूच्या व्यसनाला कंटाळून आणि लग्नात अडथळा ठरत असल्याच्या कारणावरून लहान भावानेच 'आपल्या मोठ्या भावाचा' खून केल्याची खळबळजनक घटना असून श्रीरामपूर तालुक्यातील उक्कलगाव...