Thursday, October 15, 2026
Homeजळगावफैजपूर : प्रभारी ग.शि.अ.विजय पवार यांच्या कार्याचा गौरव

फैजपूर : प्रभारी ग.शि.अ.विजय पवार यांच्या कार्याचा गौरव

फैजपूर, यावल (वार्ताहर) –

चिनावल तालुका रावेर येथील नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातर्फे मुख्याध्यापक सौ. शारदा बैरागी यांनी प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार हे प्रभारी गटशिक्षणाधिकारी पदावरून कार्यमुक्त होत असल्यामुळे त्यांना निरोप दिला.

- Advertisement -

प्रभारी गटशिक्षणाधिकारी विजय पवार यांनी रावेर तालुक्यात शैक्षणिक व प्रशासकीय सेवा बजावतांना पूर्ण रावेर तालुक्यामध्ये विविध उपक्रम राबविले.

त्यांचे हे शैक्षणिक कार्य शिक्षण प्रेमींच्या कायम स्मरणात राहील त्यांच्या शैक्षणिक कार्याचा गौरव म्हणून त्यांचा सत्कार करून निरोप देण्यात आला. याप्रसंगी प्राचार्य शारदा बैरागी, पी.एम.जावळे, एम.एस. महाजन, ए.व्ही.राणे व सर्व शिक्षा अभियान कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

पडसाद : ‘सहकारा’तील स्वाहाकाराने ‘समता’ दुभंगली!

0
नाशिक | शैलेंद्र तनपुरे - दै. 'देशदूत' - संपादक नाशिक जिल्हा सरकारी व परिषद कर्मचारी सहकारी बँकेवरील व्यवस्थापन समितीच्या नियुक्तीवरून सध्या जिल्हाभरात बरीच खळबळ माजलेली...